IMPIMP

Maharashtra Monsoon Update | राज्यात येत्या दोन दिवसात धो..धो..; हवामान विभागाचा अंदाज

by nagesh
Maharashtra Monsoon Update | maharashtra imd weather update rainfall 21 june know national weather

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Monsoon Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाची (Maharashtra Monsoon Update) प्रतीक्षा आहे. उशिरा का होईना राज्यात 23 जून नंतर पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांत राज्यात चांगला पाऊस असेल, आणि 21 जूनपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यात धो..धो..पाहायला मिळणार आहे.

23 जून नंतर पुणे (Pune), मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Monsoon Update) शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जूनचे शेवटचे आठ ते दहा दिवस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस होईल, असे सांगण्यात आले आहे. मान्सूनच्या वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. 21 तारखेपासून हलका पाऊस पडेल. त्यानंतर 24-25 जून रोजी पावसाची शक्यता आहे.

 

पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बिपरजॉय (Biporjoy Cyclone) सध्या उत्तर भारतात उपलब्ध आहे.
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यामधील प्रवाह महत्त्वाचे आहेत. कोकण (Konkan),
मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि पुण्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
जून महिन्यात पावसाला उशीर झाला असला तरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे.
एल निनोचा (El Nino) फारसा परिणाम होणार नाही. सौम्य प्रभाव राहील.
अनेकदा एल निनो आणि चांगला पाऊस असला तरी घाबरण्याचे कारण नाही, असे हवामान खात्याने (IMD) म्हटले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

दरम्यान, पेरणीसाठी पोषक वातावरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात तयार होईल.
त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरपूर
पाऊस पडेल व जूनमध्ये जे नुकसान झाले आहे, ते भरून निघेल.
ऑक्टोबरमध्ये मान्सून परत येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी तोपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे.

Web Title : Maharashtra Monsoon Update | maharashtra imd weather update rainfall 21 june know national weather

Related Posts