IMPIMP

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी जोर’धार’

by nagesh
Maharashtra Rain Update | heavy rainfall likely to continue for next three hrs over mumbai thane and parts of raigad and palghar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Monsoon Update | मागच्या आठवड्यामध्ये पावसाने (Rain) विश्रांती घेतली होती. आज मात्र पावसाने राज्यातील (Maharashtra Monsoon Update) काही ठिकाणी थैमान घातले आहे. तर काही ठिकाणी प्रतिक्षा कायम आहे. मुंबईसह (Mumbai) पुण्यात (Pune) सध्या पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही जिल्ह्यात तर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department-IMD) अंदाजानुसार, गेल्या आठवड्यात पाऊस बरसणार असं सांगण्यात आलं होतं. दरम्यान तेव्हा पावसाने दडी मारली. सध्या राज्यातील काही भागात पावसाची लगभग दिसून येत आहे. मनमाड लगतच्या कातरवाडी शिवारात सोमवारी संध्याकाळी पावसाने जोर धरला होता. त्यामुळे कात्रा डोंगरावरून धबधबा वाहायला सुरुवात झाली आहे. तसेच, वाशिम जिल्ह्यात 4 दिवसांच्या खंडानंतर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली.

 

दरम्यान, मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
या ठिकाणीही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली.
साधारण तासभर झालेल्या पावसाने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. तर हिंगोलीतही मुसळधार पाऊस झाला आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon konkan maharashtra vidarbha update

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच भूमिकेत’; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि डेटाचा फायदा, किंमत 100 रुपयांपेक्षा सुद्धा कमी

BSNL Recharge Plan | BSNL चा असा रिचार्ज प्लान पाहिला नसेल! केवळ 107 रुपयात भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणखी अनेक सुविधा

 

Related Posts