IMPIMP

Maharashtra Municipal Corporation-ZP Elections | राज्यातील महानगरपालिका, झेडपींच्या निवडणुकांची रणधुमाळी दिवाळीनंतरच ?

by nagesh
Maharashtra Municipal Corporation-ZP Elections | 22 municipal corporation Zilla Parishad elections hold on after diwali Election commissions explanation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Municipal Corporation-ZP Elections | राज्यातील मुदत संपलेल्या २२ महानगरपालिकांसह, जिल्हा परिषद (Zilla Parishad), नगरपालिका आणि पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) निवडणुका जून व जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग (Election Commission) तयार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. आयोगाने तसे कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पावसाळ्यात निवडणुका घेण्यास अडचणी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर (Kiran Kurundkar) यांनी सांगितले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Municipal Corporation-ZP Elections) रणधुमाळी दिवाळीत होणार हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचा २३ एप्रिलला कोल्हापुरात (Kolhapur) समारोप झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) म्हणाले की, २५ एप्रिलला ओबीसी आरक्षणावर (Maharashtra OBC Reservation) सुनावणी होत आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास राज्य सरकारला (Maharashtra State Government) निवडणूक घ्याव्या लागतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आदेश दिले होते. मात्र २५ एप्रिलला ही सुनावणी झाली नसून ४ मे ला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करून पावसाळ्यात निवडणुका घेण्यात अडचणी असल्याचे सांगितले आहे. (Maharashtra Municipal Corporation-ZP Elections)

 

एकाच टप्प्यात एवढ्या सगळ्या निवडणुका घेणे शक्य नाही. निवडणुका घ्यायच्या झाल्यास दोन तीन टप्प्यात घ्याव्या लागतील. असे आयोगाने स्पष्ट केले आहे. जरी ४ मे ला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तरी जून – जुलै किंवा पावसाळ्यापूर्वी निवडणूका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकांचा बार हा दिवाळीनंतर उडणार असल्याचे दिसत आहे. जर ऑक्टोबरमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली तर किमान ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असतो. त्यामुळे दिवाळी झाली की, नोव्हेंबर- डिसेंबरला कोणताही सण अथवा अडचणी नाहीत त्यामुळे या महिन्यातच निवडणूक होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुदत संपलेल्या आणि जूनमध्ये मुदत संपणाऱ्या महापालिका

कोल्हापूर, पुणे, पिंपरी – चिंचवड, ठाणे, भिवंडी – निजामपूर, मुंबई, नवी मुंबई, कल्याण – डोंबिवली, मीरा – भाईंदर, उल्हासनगर, वसई – विरार, पनवेल, मालेगाव, नागपूर, सोलापूर, अकोला, परभणी, लातूर, अमरावती, चंद्रपूर, नांदेड आणि औरंगाबाद.

 

सुनावणी लांबल्याने…
मुंबई, कोकण आणि कोल्हापुरात जून – जुलैला पावसाचे प्रमाण अधिक असते.
७ एप्रिलला जर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असती तर निवडणुका (Municipal Corporation-ZP Election) घेण्याचे आदेश आले असते.
आणि जून पर्यंत निवडणूका घेणे शक्य झाले असते. मात्र सुनावणी मे मध्ये होत आहे.
त्यामुळे ऐन पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नसल्याचे आयोगाला वाटत आहे.

 

Web Title :- Maharashtra Municipal Corporation-ZP Elections | 22 municipal corporation Zilla Parishad elections hold on after diwali Election commissions explanation

 

हे देखील वाचा :

ED Summons To Shivsena MP Bhavana Gawali | मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीचे समन्स; पुढील आठवड्यात चौकशी

Pune Fire | आगीत सापडलेले सोन्याचे दागिने अग्निशामक दलाने केले परत; लक्ष्मी रोडवरील सराफाच्या कार्यालयात लागली होती आग

Pune PMC Anti-Encroachment Campaign | महापालिकेकडून पंचनामे केले जात नसल्याने संघटना आक्रमक; कायद्यातील तरतुदी तपासून पंचनाम्याबाबत निर्णय घेण्याची मनपा प्रशासनाची तयारी

 

Related Posts