IMPIMP

Pune Fire | आगीत सापडलेले सोन्याचे दागिने अग्निशामक दलाने केले परत; लक्ष्मी रोडवरील सराफाच्या कार्यालयात लागली होती आग

by nagesh
Punr Fire | The gold ornaments found in the fire were returned by the fire brigade; The fire broke out at Jewelers' Office on Laxmi Road Pune12:53 P

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Fire | ज्वेलर्सच्या कार्यालयाला (Jewelers’ Office) लागलेल्या आगीत (Pune Fire) कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी त्यातून दागिन्यांचे बॉक्स एकत्र करुन ते सराफाला परत केले. लक्ष्मी रोडवरील (Laxmi Road Pune) सोन्या मारुती चौकातील (Sonya Maruti Chowk) युनिटी अपार्टमेंटमधील तिसर्‍या मजल्यावर एका सराफाचे कार्यालय आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या कार्यालयातील टेबलाच्या खणात सोन्या चांदीचे दागिने ठेवण्यात आले होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या कार्यालयातून धूर येत असल्याचे दिसल्यावर नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले. तातडीने ३ गाड्या घटनास्थळी आल्या. तेथील सुरक्षा रक्षकाने गेट उघडून दिले. लाकडी वासे, फर्निचरमुळे आत आग लागून खूप धूर साठला होता. (Pune Fire)

 

 

त्यामुळे आत नेमके काय हे समजू शकत नव्हते. जवानांनी धूर कमी करुन आत जाऊन पाणी मारुन आग विझविली. आगीत कार्यालयातील सर्व फर्निचर, लॅपटॉप व इतर साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी पाणी मारल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. तेथील टेबलांमध्ये सोन्याचे दागिन्यांचे बॉक्स असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. तेव्हा, त्यांनी या सर्व जळालेल्या साहित्यातून हे बॉक्स शोधून ते या व्यावसायिकाला परत केले.

 

 

Web Title : Punr Fire | The gold ornaments found in the fire were returned by the fire brigade; The fire broke out at Jewelers’ Office on Laxmi Road Pune12:53 P

 

हे देखील वाचा :

Pune PMC Anti-Encroachment Campaign | महापालिकेकडून पंचनामे केले जात नसल्याने संघटना आक्रमक; कायद्यातील तरतुदी तपासून पंचनाम्याबाबत निर्णय घेण्याची मनपा प्रशासनाची तयारी

Fuel Price Hike Impact On Milk Delivery | इंधन दरवाढीची झळ दूध वितरकांनाही ! कमिशन वाढवून मिळावे यासाठी बिबवेवाडी, कात्रज परिसरातील ‘गोकुळ’ दूध वितरकांचा दूध न उचलण्याचा इशारा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts