IMPIMP

Maharashtra Pension News | कर्नाटक-महाराष्ट्र सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात दहा हजार रूपयांनी वाढ

by nagesh
Maharashtra Pension News | maharashtra government to give 20 thousand pension to kin of martyrs

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Maharashtra Pension News | महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील (Maharashtra Karnataka Border
Movement) हुतात्म्यांच्या वारसांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात (Pension) दहा हजार रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता
हुतात्म्यांच्या वारसांना २० हजार रूपये इतके निवृत्तीवेतन मिळणार आहे. ही वाढ १ नोव्हेंबर २०२२ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.
(Maharashtra Pension News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादात ज्या व्यक्तींने बलिदान दिले, त्यांना हुतात्मे म्हणून घोषीत करण्यात आले. व त्यांच्या हयात कुटुंबियांना (हयात विधवा पत्नी, आई व वडील यांपैकी एक) निवृत्तीवेतन देण्याचा १९९७ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. सुरूवातीला १ हजार रूपये वेतन दिले जात होते. पुढे त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आली. आणि २०१४ पासून ते १० हजार रूपये प्रतिमहिना करण्यात आले. राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच सीमा आंदोलनातील हौतात्म्यांना निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

 

२२ नोव्हेंबर २०२२ पासून स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन वाढवून ते २० हजार रूपये करण्यात आले. त्याच धर्तीवर सीमा आंदोलनतील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनात १० हजार रूपयांची वाढ करण्यात आली. आणि आता ते प्रतिमहिना २० हजार रूपये इतके असणार आहे. तर करण्यात आलेली ही वाढ १ नोव्हेंबर २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे. (Maharashtra Pension News) त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनादरम्यान हौतात्म्य पत्करलेल्यांच्या वारसांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Pension News | maharashtra government to give 20 thousand pension to kin of martyrs

 

हे देखील वाचा :

<Maharashtra MLC Elections | कोकणात महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

Pune Crime News | खंडणीसह गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार उमेश वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 9 वी कारवाई

Ajit Pawar On Pune Police | पुणे पोलिसांच्या ‘त्या’ निर्णयावर अजित पवारांची टीका; म्हणाले – ‘…तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नयेत’ (VIDEO)

 

Related Posts