IMPIMP

Maharashtra Political Crisis | राष्ट्रवादीचे 4 आमदार बहुमत चाचणीवेळी राहू शकतात गैरहजर ? ठाकरे सरकार कसा काढणार मार्ग

by nagesh
MNS On NCP -Shivsena | shiv sena is sharad pawars caged cat in the zoo mns leader sandeep deshoande snarky criticism

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Rebel Leader Eknath Shinde) आणि भाजपा (BJP) अ‍ॅक्शन मोडमध्ये असून राज्यात सत्ता स्थापनेसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्याच म्हणजे 30 जून रोजी बहुमत (Majority) सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीतील इतर पक्ष कोणती भूमिका घेतात यावर सर्व अवलंबून आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी मविआ सरकारपुढे (Mahavikas Aghadi Government) सध्या अनेक अडचणी दिसून येत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जर उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्ट (Floor Test) झाली तर शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडीकडे (Maharashtra Political Crisis) किती संख्याबळ असेल हा महत्वाचा मुद्दा आहे. शिवाय, आणखी एक मोठी अडचण महाविकास आघाडी समोर असेल ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 4 आमदार बहुमत चाचणीला गैरहजर राहू शकतात. मात्र, याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही.

 

कारण, महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य अनिल देशमुख (Anil Deshmuk) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे जेलमध्ये आहेत.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोनाची लागण झाली आहे.
हे दोन्हीही नेते क्वारंटाईन आहेत.
त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीसाठी राष्ट्रवादीचे हे 4 आमदार हजर राहण्याची शक्यता खुपच कमी आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढू शकतात.

 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केल्याने ठाकरे सरकार (Thackeray Government) अल्पमतात आले आहे.
इतके दिवस पडद्यामागून हालचाली करणार्‍या भाजपाने आता थेट समोर येऊन बंडखोर आमदारांना हाताशी घेऊन सत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भाजपा नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्या म्हणजे 30 जूनला बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आहे.
यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Legislative Special Session) भरवले जाणार आहे.
त्यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईत बोलावले आहे.
आमचे सरकार बहुमत चाचणीत टिकेल असा दावा मविआ नेते करत आहेत.
दरम्यान, उद्या बहुमत चाचणीसाठी सर्व बंडखोर आमदारांसह मुंबईत येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | 4 ncp mlas absent during majority test mahavikas aghadi thackeray government in trouble maharashtra political crisis

Related Posts