IMPIMP

MNS Sandeep Deshpande | व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसेचा शिवसेना अन् राष्ट्रवादीवर निशाणा

by nagesh
Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande corruption allegations on uddhav thackeray reveals on 23 january

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMNS Sandeep Deshpande | राज्यातील सत्ता संघर्षाने संपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एक पत्र जाहीर केलं होतं. त्यामध्ये बंडखोर आमदारांना (Rebel MLA) भावनिक आवाहन केले होते. आपला कुटुंबप्रमुख म्हणून आपली काळजी वाटते. अजूनही वेळ गेली नाही, समोर येऊन बोला, आपण मार्ग काढू, अशा शब्दात ठाकरेंनी आमदारांना आश्वस्त केलं होत. आता यावरून मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpand) यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र शेअर करत उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या हातात बंडखोरांसाठी परत येण्यासाठीचं विनंती पत्र दिसत आहे. तर त्याचवेळी पाठीमागे अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच (NCP Chief Sharad Pawar) उद्धव यांच्या हातात सुरा सोपवत आहेत असं चित्रित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आमदारांचं पाठबळ असल्याचे चित्रात दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्रासाठी संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी काळजी आणि victimcard असे हॅशटॅग वापरले आहेत.

 

 

मुख्यमंत्र्यांचं भावनिक आवाहन

गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांना परत फिरण्याचं आवाहन एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही. समोर येऊन बोला आपण यातून मार्ग काढू. अशा शब्दात ठाकरे यांनी आमदारांना आश्वस्त केलं. गुवाहाटीमध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून अडकून पडला आहात. आपल्यातील काही आमदार संपर्कात आहेत. आपणही मनाने अजूनही शिवसेनेतच (Shivsena) आहात. काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या भावनांचा आदर करतो. अजूनही वेळ गेलेली नाही, असे ठाकरे यांनी या पत्रात म्हंटले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिंदेंनी दिले प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पत्र लिहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून याला उत्तर दिले आहे.
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,
याचा अर्थ काय ? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच यावेळी #donttrickmaharashtra असा नवा हॅशटॅगही वापरला आहे.

 

Web Title :- MNS Sandeep Deshpande | mns sandeep deshpande tweet says shivsena playing victim card maharashtra political crisis

Related Posts