IMPIMP

Maharashtra Political Crisis | ‘बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी’

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar replied shiv sena chief uddhav thackeray over criticism on union minister home minister amit shah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Political Crisis | राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेत्यांची बैठक घेऊन मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आली पाहिजे असे सांगितले. यावेळी शाह यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना धोका देणाऱ्यांना जमीन दाखवा असे म्हणाले होते. अमित शाह यांच्या टीकेला शिवसेनेने (Maharashtra Political Crisis) रोखठोक शब्दात पलटवार केला. आता त्याला पुन्हा भाजपकडून बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

एका तडीपार गुंडाचे ऐकेल एवढा महाराष्ट्र दुबळा नाही, अशी टीका शिवसेनेकडून अमित शाह यांच्यावर करण्यात आली होती. तसेच दसरा मेळावा (Dussehra Melava) शिवाजी पार्कवरच (Shivaji Park) घ्यायचा आहे. आतापर्यंत बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा (CM) मास्क होता. त्यामुळे मला जरा जपूनच बोलावं लागत होतं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचे आहे ते मी बोलेन, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केला. याला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

….आधी आपली लायकी तपासावी

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला
असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बापाच्या जीवावर जगणाऱ्यांनी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी.
बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते, अशा बोचऱ्या शब्दात
भातखळकर यांनी टीका केली आहे.

 

तसेच असेही फाजील बकवास करण्यासाठी आपला लौकिक आहे. मास्क असो वा नसो जे काही बोलाल ते मेंदूच्या
जेमतेम क्षमतेनुसारच, असा घणाघात अतुल भातखळकर यांनी दुसऱ्या ट्विटमधून केला आहे.
एकंदरीतच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष विकोपाला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar replied shiv sena chief uddhav thackeray over criticism on union minister home minister amit shah

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकते DA वाढीची भेट, असे करा कॅलक्युलेट

MP Navneet Rana | ‘लव्ह जिहाद’वरुन खासदार नवनीत राणा पोलीस ठाण्यात आक्रमक; दोन तासात मुलीचा शोध घ्या, राणांचा पोलिसांना अल्टिमेटम (व्हिडिओ)

Pune Crime | लोहगाव येथे मटका अड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 12 जणांवर कारवाई

 

Related Posts