Maharashtra Political News | भाजपाच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | भाजपाच्या (BJP) ‘एक्स’ अकाऊंटवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ३१ सेकंदाचा ‘नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. मात्र, काही वेळातच तो व्हिडिओ डिलिट करण्यात आला. मात्र, त्यावर उलट-सुलट चर्चा होऊ लागल्याने भाजपा आणि मित्रपक्षांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Political News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
एक वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी भाजपाने ट्विट केलेला व्हिडीओ पाहिला नाही. व्हिडीओ बघावा लागेल. थोडक्यात शिंदे यांनी यावर सविस्तर बोलणे टाळले आहे.
भाजपाच्या या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा कधीही येऊ शकणार नाहीत. संपूर्ण भाजपला फडणवीसांच्या हो ला हो करावे लागते. त्यामुळे ते असे काहीतरी करतात.
तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर स्पष्टीकरण दिले की, फडणवीसांनी स्पष्ट सांगितले आहे की एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही जर तर च्या प्रश्नांना काहीच अर्थ नाही. तसेच हा जुना व्हिडिओ पुन्हा का ट्विट करण्यात आला? याबद्दल लवकरच माहिती मिळेल.
दरम्यान, भाजपकडून अचानक हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
कमालीचे नाराज झाल्याचे समजते. (Maharashtra Political News) तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत
यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी पुन्हा येईन. ते पुन्हा आले आहेत.
सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनादेखील घेऊन आले;
पण या व्हिडिओवर योग्य स्पष्टीकरण हे भाजपच देईल. निवडणुका या मात्र शिंदेंच्या नेतृत्वाखाली होतील.
तसेच शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपाच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले की,
सध्या देवेंद्र फडणवीस सुद्धा सत्तेत आहेत. तसेच सत्तेत ते समान भागीदार आहेत.
आता लवकरच निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करू.
हा त्याचा अर्थ आहे.
Comments are closed.