IMPIMP

Sahyadri Express | गुडन्यूज : सह्याद्री एक्स्प्रेस ५ नोव्हेंबरपासून पुन्हा धावणार, सध्या पुणे ते कोल्हापूरपर्यंत

by sachinsitapure
Kolhapur-Pune-Mumbai Route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Sahyadri Express | सह्याद्री एक्स्प्रेस ही पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur) आणि मुंबईतील (Mumbai) प्रवाशांसाठी अतिशय सोयीची गाडी होती. मात्र, रेल्वेने ती कोरोना काळात बंद केली, ती अजूनपर्यंत बंदच होती. आता ती ५ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असला तरी सध्या ती पुणे ते कोल्हापूर अशीच धावणार आहे. मुंबईत सीएसटी रेल्वे स्थानकातील (CST Railway Station) प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम पूर्ण झाल्यावर ती पूर्वीप्रमाणे मुंबईपर्यंत धावेल. (Sahyadri Express)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे सह्याद्री एक्स्प्रेसच्या (Sahyadri Express) प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ३०-३५ वर्षे सलग कोल्हापूर-पुणे-मुंबई मार्गावर (Kolhapur-Pune-Mumbai Route) धावणारी ही गाडी कोरोना काळात फेब्रुवारी २०२० पासून बंद केली होती.

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून सुरू होती. यासाठी काही मंत्र्यांनी देखील पाठपुरावा केल्याने अखेर कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सह्याद्री एक्स्प्रेसचे वेळापत्रक

५ नोव्हेंबरपासून रोज रात्री ११.३० वाजता कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल.
सकाळी ७.४५ वाजता पुण्यात पोहचेल.
पुण्यातून रोज रात्री ९.४५ वाजता सुटेल
कोल्हापुरात पहाटे ५.४० वाजता पोहचेल.

Related Posts