Maharashtra Political News | ‘भाकरी फिरवण्याचा अर्थ अजित पवारांना दूर केलं पाहिजे’, शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची प्रतिक्रिया
मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) वतीने आयोजित युवा मंथन कार्यक्रमात बोलताना भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असे विधान केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) चर्चा रंगत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून यावर स्पष्टिकरण दिले जात आहे. तर शिवसेनेचे (Shivsena) नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांचा बोलण्याचा रोख अजित पवारांकडे (Ajit Pawar) असल्याचे म्हटले. तसेच अजित पवारांना बाजुला करण्यासाठी राष्ट्रवादीत खटाटोप सुरु असल्याचे म्हस्के म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
हवं तर सकाळच्या भोंगा वाजतो त्यांना विचारा
नरेश मस्के म्हणाले, शरद पवार यांचं वक्तव्य मी ऐकलं. शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ सरळ-सरळ आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. पक्षसंघटनेत नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. भाकरी फिरवली पाहिजे, याचा अर्थ अजित पवारांना (Maharashtra Political News) दूर केलं पाहिजे, असा सरळ अर्थ होतो. हवं तर तुम्ही सकाळचा भोंगा वाजतो, त्यांना विचारा.
अजित पवारांना बाजूला करण्याचा खटाटोप
गेल्या आठवड्यात पवार कुंटुंबामध्ये कुणाला तरी खासदारकीची (MP) उमेदवारी दिल्याच्या कारणावरुन अंतर्गत गृहकलह झाला.
त्यानंतर सगळं रामायण घडलं. परवा शरद पवार म्हणाले संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार आहेत, त्यांना अनेक गोष्टी माहित असतात. तुम्ही देखील पत्रकार आहात, तुम्हीही माहिती काढा. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी जे रामायण घडलं ते कशामुळे घडलं? याची माहिती काढा. आपल्याला माहिती मिळाली नाही तर, उद्या सकाळी भोंग्याला विचारा, कारण त्यांची शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीसोबत जास्त निष्ठा आहे. अजित पवारांना बाजूला करण्याचा खटाटोप राष्ट्रवादीत सुरु आहे. भाकरी फिरवणे म्हणजे नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे,
हा रोष आणि रोख अजित पवार यांच्याकडेच असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Maharashtra Political News | thane shivsena leader naresh mhaske on sharad pawar statement about bhakari should rotated means ajit pawar should be remove from ncp
Comments are closed.