IMPIMP

Maharashtra Politics | जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्यास दहा लाखांचे बक्षिस; भाजप पदाधिकाऱ्याची अजब घोषणा

by nagesh
Maharashtra Politics | 10 lakh reward cutting jitendra awhad tongue bjp obc morcha leader kapil dahekar in jalna

जालना : सरकारसत्ता ऑनलाईन  Maharashtra Politics | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीका होत आहे. महाराष्ट्रातील महापुरूषांबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सत्ताधारी भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. त्यातच एका भाजप पदाधिकाऱ्याच्या अक्षेपार्ह घोषणेची चर्चा सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस अशी घोषणा संबंधीत भाजप (BJP) पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जालना येथे जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर (Kapil Dahekar) यांनी म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो जीभ छाटेल त्याला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल.’ असे वादग्रस्त विधान यावेळी बोलताना कपिल दहेकर यांनी केले.

 

दरम्यान, मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रोखत ताब्यात घेतले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्र सन्मान परिषदेत बोलताना म्हणाले होते की, ‘एमपीएससीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला.
एके दिवशी तावडेंनी (Vinod Tawde) विधानसभेत सांगितलं की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार.
मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत.
अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आहेत ना.
शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे. १६६९ साली दुष्काळ होता.
तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते.’
असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जितेंद्र आव्हाड यांच्या याच विधानांवर आक्षेप नोंदवत सत्ताधारी भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | 10 lakh reward cutting jitendra awhad tongue bjp obc morcha leader kapil dahekar in jalna

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime News | मस्करी बेतली जीवावर ! एका कैद्याकडून दुसऱ्या कैद्याची हत्या, कोल्हापूरमधील घटना

Sanjay Rathod | शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आमदार एकमेकांच्या संपर्कात; माजी मंत्री संजय राठोड यांच्या वक्तव्याने खळबळ

Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपच्या दृष्टीने माजी खासदार संजय काकडे यांचा ‘उपयोग’ संपला? कसब्यातील उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी पक्षाकडून साधे निमंत्रणही नाही

 

Related Posts