IMPIMP

Maharashtra Rain Update | ‘आगामी आठवड्यातच मान्सूनचे आगमन’; IMD चा अंदाज

by nagesh
Rain in Maharashtra | maharashtra rain update heavy rain in maharashtra mumbai pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Rain Update | राज्यात गेल्या महिन्यापासून उन्हाचा कडाका लागला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाची झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उन तर काही ठिकाणी पावसाची (Maharashtra Rain Update) स्थिती निर्माण झाली आहे. सध्या असानी चक्रीवादळामुळे (Cyclone Asani) राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे. यातच आगामी तीन आठवड्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) वर्तवली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दरवर्षी प्रमाणे अंदमानात (Andaman) 22 मेपर्यंत पावसाचं आगमन होतं. मात्र, 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावणार आहे. तसेच, केरळमध्ये (Kerala) 20 ते 26 मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर कोकणात (Konkan) 27 मे ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार आहे. 13 ते 19 मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याची माहिती (IMD) आहे. (Maharashtra Rain Update)

 

 

‘अंदमानानवर आगामी पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल.’ अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnananda Hosalikar) यांनी दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, चक्रीवादळामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली तसेच कर्नाटक, केरळमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.

 

Web Title :-  Maharashtra Rain Update | rainfall forecast for coming 4 weeks by imd monsoon

 

 

हे देखील वाचा :

Children Health Care Tips | मुलांना ‘या’ गोष्टींपासून दूर ठेवा, आरोग्यावर होतो नकारात्मक परिणाम; जाणून घ्या

Former MLA Mohan Joshi | मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा व्हावा ! माजी आमदार मोहन जोशी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर हनुमान चालिसा बंद करावी’ – किरीट सोमय्या

 

Related Posts