IMPIMP

Maharashtra Weather Update | आजपासून राज्यात पावसाची शक्यता; कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस कोसळणार

by nagesh
Maharashtra Weather Update | rain in various parts of the state from today imd

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Weather Update | राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आजपासून (23 जून) राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पावसाच्या (Rain) प्रतीक्षेत आहे.

11 जून रोजी कोकणात दाखल झालेल्या मान्सून (Monsoon) वाऱ्यांच्या पुढील हालचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपासून कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात (Vidarbha) मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा (Maharashtra Weather Update) जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सूनची बंगालची शाखा अधिक मजबूत होत आहे. लांबलेल्या पावसामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी (Farmer) अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांची पिके करपून गेली आहेत. काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.
लवकर पाऊस न झाल्यास पिके वाया जाण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी पिके वाया गेली आहेत.

मराठवाड्यात (Marathwada) 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
तर विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे
असणार आहे. तर पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अद्याप मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले नाही.

Web Title : Maharashtra Weather Update | rain in various parts of the state from today imd

Related Posts