IMPIMP

Maratha Reservation | मराठा आरक्षणातील ‘सगेसोयरे’चा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमातींनाही फायदा; काय नेमके म्हटले आहे अध्यादेशात, कसा होणार इतरांनाही फायदा, जाणून घ्या

by sachinsitapure
Maharashtra Govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maratha Reservation | राज्य शासनाने २६ जानेवारी रोजी सुट्टीच्या दिवशी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एका अध्यादेश काढला आहे. या अधिसूचनेत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मासागवर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० मध्ये सूधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा मराठा (Maratha Reservation) प्रमाणेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातील, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग यांनाही होणार आहे. (Maharashtra Govt)

त्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तीच्या माहितीकरीता उक्त अधिनियमांच्या कलम १८ च्या पोट -कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे या द्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि या द्वारे नोटीस देण्यात येत आहे की, उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून १६ फेब्रुवारी २०२४ रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. या दिनांकापूर्वी ज्यांना कोणत्याही हरकती किंवा सूचना द्यायच्या आहेत. त्यांनी सामाजिक न्याय व विशेष विभागाचे सचिव यांच्याकडे द्याव्यात, असे आवाहन केले आहे.

नियमांचा मसुदा

या नियमांस महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळीचे विनियम) (सुधारणा) नियम २०२४ असे म्हणावे. त्यात नियम २ व्याख्या मधील उपनियम (१) मधील खंड (ज) नंतर खालील उपखंड सामाविष्ठ करण्यात येईल.

(ज) (एक) सगेसोयरे – सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडिल, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेले लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल, यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.
नियम क्रं. ५ मधील उपनियम (६) मध्ये क्रमश पुढीलप्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे.

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भाव -भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगेसोयरे ते तसेच नातेवाईक अथवा सगे सोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करुन दिल्यास तथा गृहचौकशी करुन नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयर्‍यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करुन तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील पुरावा आढळ्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१२ नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

ज्या मराठा बांधवांची कुणगी नोंदी सापडल्या आहेत. त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्या सोयर्‍यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयर्‍यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.

ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापउली आहे. त्यांचे सगेसोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी
लग्नाचया सोयरिकी होतात. ते सर्व सगे सोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्वसाधारणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक
असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात, त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा
उपलब्ध करुन दिल्सास गृह चौकशी करुन त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील
सग्यासोयर्‍यांना जात प्रमापत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये,
म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृहचौकशीत तश प्रकारचा पुरावा मिळणे हे
देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.

सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व
विशेष मागासप्रवर्गासाठी लागू राहील. अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये : (ज) उपलब्ध असल्यास,
पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि /किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या
चुलत्यांचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र
या अधिसूचनेनुसार जे सोयी मराठा यांना मिळणार आहेत. त्यासर्व अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,
इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गालाही मिळणार आहे. त्यामुळे इतर मागासवर्गामधील अनेकांदा या सगे सोयरे
याचा फायदा होणार आहे.

Related Posts