IMPIMP

Marathwada Teacher Constituency | मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांना मोठा धक्का; विश्वासू सहकारी भाजपच्या गोटात

by nagesh
Marathwada Teacher Constituency | marathwada graduate constituency election ncp mla vikram kale faithful colleague joins bjp

परभणी : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्यातील शिक्षक (Teacher Constituency) आणि पदवीधर मतदारसंघाच्या (Graduate Constituency) पाच जागांसाठी निवडणुक होणार आहे. त्यात विविध पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे पर्यायाने संबंधित पक्षाला आयात केलेल्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागला. त्यामुळे अगदी अर्ज भरण्याच्या दिवसापासूनच या निवडणुका चांगल्याच गाजत आहेत. त्यातच मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे (Marathwada Teacher Constituency) विद्यमान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे Nationalist Congress Party (NCP) उमेदवार आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांना परभणी येथे मोठा धक्का बसला आहे. परभणी येथील त्यांचे विश्वासू सहकारी सुभाष भारतीय (Subhash Bhartiya) यांनी भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला आहे. भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांच्या उपस्थितीत गंगाखेड येथे भाजपमध्ये प्रवेश केला. सुभाष भारतीय हे विक्रम काळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने विक्रम काळे यांच्यासाठी परभणी येथे मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. (Marathwada Teacher Constituency)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुभाष भारतीय हे ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोशिएशन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष असून ते विक्रम काळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे विक्रम काळे यांचे ऐन निवडणुकीच्या तोंडावर टेन्शन वाढणार आहे. गंगाखेड येथे भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गंगाखेड येथे सुभाष भारतीय यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष मुरकुटे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, डॉ. विठ्ठलराव रबदडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. (Marathwada Teacher Constituency)

 

एकीकडे मराठवाडा शिक्षक मतदार संघात विक्रम काळे यांच्या पक्षाच्याच सोळुंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचा फटका विक्रम काळे यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. आणि असे असतानाच परभणी येथील विक्रम काळे यांचे विश्वासू समजले जाणाऱ्या सुभाष भारतीय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काळे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

 

Web Title :- Marathwada Teacher Constituency | marathwada graduate constituency election ncp mla vikram kale faithful colleague joins bjp

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | PM नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप-शिंदे गटाची संयुक्त बैठक

Pune Lodha Belmondo Project | लोढा ग्रुपच्या मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. कंपनीकडून शेकडो फ्लॅटधारकांची फसवणूक झाल्याचा आरोप; 22 जानेवारीला आंदोलनाचा इशारा

Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे का उपस्थित राहत नाहीत? यावर स्पष्टच बोलल्या पंकजा मुंडे, म्हणाल्या…

 

Related Posts