IMPIMP

MLA Bhaskar Jadhav | डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात भास्कर जाधवांना दिलासा, पुणे न्यायालयाकडून ‘या’ दोन अटींवर हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर

by nagesh
MLA Bhaskar Jadhav | MLA Bhaskar Jadhav gets relief from Pune court; Granted anticipatory bail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   कुडाळ येथे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांच्या विरुद्ध सुरु असलेल्या कारवाई विरुद्ध शिवसेना आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी भाषणामध्ये भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane), माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) व आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) याच्यावर टीका केली होती. त्यावर पुण्यातील भाजप (BJP) कार्यकर्त्याने सामाजिक भावना भडकावल्या प्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशन (Deccan Police Station) येथे गुन्हा (FIR) दाखल केला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात (District and Sessions Court) अटकपूर्व जामीन अर्ज (Anticipatory Bail Application) दाखल केला होता. सुनावणी वेळी अॅड. ठोंबरे यांनी भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबिया विरुद्ध वैयक्तीक टीका केली असून कोणत्या समाज, जात, धर्मा विरुद्ध टीका केली नसुन केवळ भास्कर जाधव यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटी कलमे लावून खोटा गुन्हा राजकीय दबावातून दाखल केला असल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने युक्तीवाद मान्य करून जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके (District and Sessions Judge G. A. Ramteke) यांनी अटी व शर्तीवर आमदार भास्कर जाधव यांना हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर (Granted Anticipatory Bail) केला आहे.

 

भास्कर जाधव यांना शनिवारी पोलिस स्टेशनला हजेरी आणि तपास कामात सहकार्य करण्याच्या अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याची माहिती भास्कर जाधव यांचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. आमदार भास्कर जाधव यांच्या तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे, अॅड. हितेश सोनार (Adv. Hitesh Sonar), अॅड. संदीप जाधव (Adv. Sandeep Jadhav) यांनी काम पहिले

 

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्याविरोधात उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी योगेश अरुण शिंगटे Yogesh Arun Shingte (वय ३७, रा. निगडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १४४/२२) दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंगटे हे गुडलक हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी बसले होते. यावेळी ते त्यांचे फेसबुक (Facebook) अकाऊंट पहात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhav Naik) यांच्याविरुद्ध चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. या चौकशीचा निषेध करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयावर शिवसेनेने मोर्चा आयोजित केला होता.

 

या मोर्चामध्ये आमदार भास्कर (MLA Bhaskar Jadhav) जाधव यांनी भाषण केले.
त्यात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे,
आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने अर्वाच्छ भोषत वक्तव्य केले.
त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या असून राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक,
भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्यास चिथावणी दिली.

 

केंद्रीय मंत्री पद हे संविधानिक पद असून या पदाचा अपमान करुन जनमानसात
बदनामी करुन सार्वजनिक आगळीक केल्याने गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (Assistant Police Inspector Kamble) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Bhaskar Jadhav | Relief to Bhaskar Jadhav in case filed in Deccan Police Station, temporary pre-arrest bail granted by Pune Court on ‘these’ two conditions

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात चोरट्यांची दिवाळी जोरात, कर्वेनगर, हडपसरमध्ये घरफोडी; 15 लाखांचा ऐवज लंपास

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना आता घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर फिरायला गेले, भाजपच्या माजी मंत्र्याचा घणाघात

CM Eknath Shinde | ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात CM शिंदेंची शाब्दिक आतषबाजी, म्हणाले – भारत-पाकिस्तान सारखाच आम्हीही सामना खेळलो आणि…

MP Srikanth Shinde | मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘हीच विरोधकांची पोटदुखी…’

 

Related Posts