IMPIMP

MLA Eknath Khadse | ‘जे गोपीनाथ मुंडेंसोबत घडलं तेच पंकजा मुंडेंसोबत घडतंय’, एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

by nagesh
MLA Eknath Khadse | ncp eknath khadse on gopinath munde disregard in bjp same happening with pankaja munde

मलकापूर/बुलढाणा :  सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा राजकीय (Maharashtra Politics News) वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रातील काही नेत्यांकडून त्यांना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी अनेकवेळा यावर स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. तसेच जे गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यासोबत झाले तेच पंकजा मुंडे यांच्यासोबत घडतंय असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अलीकडेच पंकजा मुंडे यांनी नाशिक येथे ‘आपण कोणासमोर झुकणार नाही’, असं विधान केले होते. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. यातच शुक्रवारी सकाळी एकनाथ खडसे (MLA Eknath Khadse) यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते मलकापूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

एकनाथ खडसे म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपने प्रचंड त्रास दिला.
तेच आता पंकजा मुंडे यांच्याबाबतीत घडतंय, असे खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत घडलेली घटना सांगितली.
ते म्हणाले, स्वर्गीय भाजप नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना, त्यांना भाजपने किती त्रास दिला, हे मला माहिती आहे.

 

केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली.
त्यावेळी मी स्वत: त्यांच्यासोबत हजर होतो. मधल्या काळात गोपीनाथ मुंडे यांची इतकी छळवणूक झाली की,
त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार येत होता. पक्ष सोडून द्यावा अशी स्थिती निर्माण झाली होती.
तोच प्रकार आता पंकजा मुंडेंबरोबर सुरु आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   MLA Eknath Khadse | ncp eknath khadse on gopinath munde disregard in bjp same happening with pankaja munde

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार ! मनपाच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची ‘हद्दपार’, शासनाने जाहिर केली पुणे मनपाची सुधारित हद्द

MP Imtiaz Jalil | गिरीश महाजनांच्या आरोपांवर इम्तियाज जलील भडकले, म्हणाले-‘मला वाटायचं गिरीश महाजनांना थोडी अक्कल…’

Girish Mahajan | संभाजीनगरमधील मविआच्या सभेला परवानगी मिळणार?, गिरीश महाजानांचे मोठे वक्तव्य

 

Related Posts