IMPIMP

MNS Leader Sandeep Deshpande | राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, म्हणाले-‘…की घरी बसून अंडी उबवणार?’

by nagesh
MNS Leader Sandeep Deshpande | sandeep deshpande slams uddhav thackeray statement on rahul gandhi veer savarkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – MNS Leader Sandeep Deshpande | काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी
खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्ला चढवला. तसेच माफी मागायला माझं
नाव सावरकर नाही, गांधी आहे, असे वक्तव्य केले. यावरुन मालेगावात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी यांना
इशारा देताना सावरकरांचा (Savantrya Veer Savarkar) अपमान सहन करणार नसल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) म्हणाले, राहुल गांधी जे बोलले आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना जो इशारा दिला त्याचं वर्णन मी मॅच फिक्सिंग (Match Fixing) असं करेन. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार? हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं.

 

राहुल गांधी अपमान करत राहणार आणि उद्धव ठाकरे त्यांना उत्तर देणार, हे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात अशी स्थिती आहे. उद्या राहुल गांधी पुन्हा एकदा सावरकरांचा अपमान करतील. मग हे काय फक्त सामनात अग्रलेख लिहिणार की घरी बसून अंडी उबवणार? नेमकं करणार काय ते त्यांनी सांगावं, असं देखील संदीप देशपांडे म्हणाले.

 

देशपांडे पुढे म्हणाले, एकीकडे उद्धव ठाकरे म्हणार आम्ही अपमान सहन करणार नाही आणि दुसरीकडे राहुल गांधी अपमान करत राहणार. त्यापेक्षा कारवाई काय करणार हे त्यांनी सांगावं.
काँग्रेस (Congress) सोबत असलेली युती तोडणार का? महाविकास आघाडीतून
(Mahavikas Aghadi) बाहेर पडणार का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MNS Leader Sandeep Deshpande | sandeep deshpande slams uddhav thackeray statement on rahul gandhi veer savarkar

 

हे देखील वाचा :

RSF Fitness Club | आर.एस.एफ फिटनेस क्लब आता पुण्यात ! सुप्रसिद्ध अभिनेते, बॉडीबिल्डर ठाकूर अनुप सिंग यांच्या हस्ते उद्घाटन

Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises (PMFME) Scheme | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना: सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून रोजगार निर्मिती !

Pune Crime News | सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांची फसवणूक; आर्थिक नुकसान करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली

Shahid Hemu Kalani | भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Related Posts