IMPIMP

MNS MLA Raju Patil | मुख्यमंत्र्यांची मनसे कार्यालयाला भेट, राजकीय चर्चेला उधाण; युतीबाबत राजू पाटलांचे सूचक विधान, म्हणाले-‘…तर एकत्र येऊ’

by nagesh
MNS MLA Raju Patil | chief minister eknath shindes visit to mns office

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Sena Chief Raj Thackeray) यांची गुढीपाडव्याला (Gudhipadva) मुंबईत सभा होत आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) मनसेचा पाडवा मेळावा (MNS Padwa Melava) होणार असून मनसे सैनिकांकडून याची जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, पाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनसे कार्यालयाला भेट दिली. मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी मुख्यमंत्र्यांचा यावेळी सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मसनसेच्या कार्यालयाला भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी यावेळी युतीबाबत सूचक विधान केलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याही पक्षाचा विचार हिंदुत्वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, मुख्यमंत्री हे डोबिवलीमधील मनसेच्या कार्यालयात आले होते. मुख्यमंत्र्यांनी विनंतीला मान दिला. त्यांनी कार्यालयाला भेट दिल्याने आनंद झाला. हिंदुत्वाचा विचार (Hindutva) आमचा सुरुवातीपासूनच आहे. आता याही पक्षाचा विचार हा हिंदुत्वाचा असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.

 

 

… तर एकत्र येऊ

मुख्यमंत्र्यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि मनसे यांच्यातील
युतीसंदर्भात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) युती होणार का? असा प्रश्न विचारला असता राजू पाटील म्हणाले, सर्वांनी एकत्र यावे का हा निर्ण राज साहेब घेतील. मात्र माझ्ये व्यक्तीगत मत म्हणाल तर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. स्वतंत्र लढलो तर कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, मात्र राज साहेब बोलले तर एकत्र येऊ असे सूचक विधान पाटील यांनी केलं.

 

 

Web Title :   MNS MLA Raju Patil | chief minister eknath shindes visit to mns office

 

हे देखील वाचा :

Premier Handball League (PHL) | प्रिमीयर हँडबॉल लीगमध्ये आता महाराष्ट्र आयर्नमेन संघाची एन्ट्री; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे संघाची मालकी

Nitin Gadkari Threat Case | नितीन गडकरी धमकी प्रकरणात तरुणी ताब्यात, नागपूर पोलीस कर्नाटकला रवाना

Gold-Silver Rate Today | पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Dada Bhuse On Autorickshaw Driver-Owner | ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लवकरच धोरण निश्चिती – मंत्री दादाजी भुसे

 

Related Posts