IMPIMP

Modi Government | दुचाकीवर 4 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्ती? मोदी सरकारने सूचना अन् हरकती मागवल्या

by nagesh
Modi Government | child pillion passengers aged between 9 months to 4 years must wear crash helmets union road transport ministry is making rules nitin gadkari modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकार (Modi Government) सतत नवनवीन नियम आणि कायदे अंमलात आणत आहे. यामध्ये रस्ते आणि वाहतुकीबाबत अनेक नवीन नियम करण्यात आले आहेत. आता दुचाकी चालकांसाठी नवीन नियम करण्यात आले आहेत. दुचाकीवर चालकासोबत 4 वर्षापर्यंतचे मूल असेल तर दुचाकीचा वेग 40 किमीपेक्षा जास्त नसावा. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने (union road transport ministry) यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. तसेच दुचाकीवर 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुल्यांच्या डोक्यावर बसेल असे हेल्मेट मोटरसायकलस्वाराने घालावे. यावर सरकारने (Modi Government) सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

गडकरी यांनी ट्विट करून दिली ही माहिती…

या संदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी ट्विट केले असून यामध्ये म्हटले आहे की, मुलांना जे हेल्मेट घातले जाईल त्या हेल्मेटला भारतीय मानक ब्युरो (BIS) ची मान्यता असावी. अन्यथा चालकावर कारवाई होईल (Helmets mandatory for children up to 4 years on a bike). मुलाला चालकाशी जोडण्यासाठी सेफ्टी हार्नेस (safety harness) लावणे आवश्यक आहे.

 

 

 

काय आहे सेफ्टी हार्नेस (What is a safety harness?)

गाडीवर मुलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी हार्नेस वापरले जाते. हा एक प्रकारचा बनियान आहे. हे मुलांना घातले जातो.
ते अ‍ॅडजस्टेबल असून त्याला जोडलेल्या पट्ट्यांची एक जोडी आणि एक शोल्डर लूप असतो, जो चालकाने घातलेला असतो. अशा प्रकारे मुलाच्या शरीराचा वरचा भाग चालकाशी किंवा दुचाकीस्वारास सुरक्षितपणे जोडलेला असतो.

सूचना किंवा हरकती कळवाव्यात (Suggestions or objections should be reported)

मंत्रालयाने (Modi Government) म्हटले आहे की, सेफ्टी हार्नेस बीआयएसच्या नियमांनुसार असावे.
वजनाने हलके आणि अ‍ॅडजस्ट करणारे असावे. वॉटरप्रूफ आणि टिकाऊ असावे.
तसेच यासंबंधी काही सूचना किंवा आक्षेप असल्यास ते ईमेलद्वारे कळवू शकता.

 

Web Title: Modi Government | child pillion passengers aged between 9 months to 4 years must wear crash helmets union road transport ministry is making rules nitin gadkari modi government

 

हे देखील वाचा :

Krishi UDAN scheme | खुशखबर! शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा, उत्पन्न दुप्पट करण्यात होईल मदत

Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव; पोलीस ठाण्यातही दाखल केली तक्रार

Pune-Mumbai Trains | ‘या’ कारणामुळे शनिवारी डेक्कन एक्सप्रेस रद्द, लोकल सेवेवर होणार परिणाम

 

Related Posts