IMPIMP

Modi government | मोदी सरकारची मोठी घोषणा ! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवणं विनामुल्य मिळणार

by nagesh
Modi Government | union cabinet gives nod start pm poshan scheme provide mid day meal students more 11 2 lakh govt

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन  Modi government | मोदी सरकारकडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना (PM POSHAN scheme) लागू करण्यात आली आहे. या योजनेनूसार (Modi government) सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत जेवण मिळणार आहे. आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

आज झालेल्या मोदी सरकारच्या (Modi government) मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
पीएम पोषण योजने (PM POSHAN scheme) अंतर्गत भारतातील 11.2 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मोफत मिळणार आहे.
आगामी वर्षासाठी ही योजना लागू राहणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकारने 1.31 लाख कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.

अनुराग ठाकूर म्हणाले की, सध्या देशात सुरू असलेल्या मिड-डे मील योजनेची Mid-day meal plan म्हणजेच मध्यान्ह भोजन योजनेची जागा घेणार आहे.
राज्यांच्या सरकारांच्या मदतीने या योजनेची केंद्राकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच यामधील सर्वाधिक वाटा केंद्र सरकार उचलणार आहे.
अशी माहिती मंत्री ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिली.

 

दरम्यान, आजच्या झालेल्या बैठकीत आणखी काही निर्णय घेण्यात आले आहेत. रेल्वे आणि शिक्षणासंदर्भातही मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कॅबिनेट बैठकीत नीचम-रतलाम रेल्वे मार्गाचे दुहेरी करण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी 1096 कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. याशिवाट राजकोट-कानानुस रेल्वे मार्गाचाही दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासाठी 1080 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
निर्यात वाढविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : king

 

हे देखील वाचा :

IBPS Recruitment 2021 | ‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 1.50 लाखांपर्यत

Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

CM Uddhav Thackeray | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार

 

Related Posts