IMPIMP

Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये घुसून 12 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

by nagesh
Mumbai Agra Highway Accident | accident near palasner village container rammed into a hotel due to brake failure

शिरपूर (धुळे) : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai Agra Highway Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ (Palasner Village) भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनर (Container Break Fail) एका हॉटेलमध्ये घुसला. या घटनेत 12 जणांचा चिरडून मृत्यू (Death) झाला तर 15-20 जण जखमी (Injured) झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, घटनास्थळी मदत कार्य सुरु झाले आहे. हा अपघात मंगळवारी (दि.4) दुपारी 12 च्या सुमारास झाला.(Mumbai Agra Highway Accident)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात धुळे-मुंबई- आग्रा महमार्गावर झाला आहे. पळासनेर येथे एक भरधाव वेगातील कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरला. यावेळी हॉटेलमधील 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरु आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे.
याच ठिकाणी दुपारी बाराच्या सुमारास एक कंटेनर भरधाव वेगात थेट हॉटेलमध्ये शिरला.
घटनास्थळी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर काही जणांचा हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहने उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहनांना धडक (Container Rammed) दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

Web Title : Mumbai Agra Highway Accident | accident near palasner village container rammed into a
hotel due to brake failure

Related Posts