IMPIMP

Mumbai crime | BMC चा अधिकारी असल्याचा आव आणत लाच मागणाऱ्याने केला चोरीचा प्रयत्न; मुंबई पोलिसांनी केली अटक

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – स्वतः बीएमसी अधिकारी असल्याची बतावणी करत लाच मागणाऱ्या आणि ती न मिळाल्यानंतर गळ्यातील चैन चोरी
(Mumbai Crime) करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय बाबूराव धोत्रे (वय 24) असे
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून ओशिवारी (Mumbai Crime) पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपी अक्षय बाबू धोत्रे (Akshay Babu Dhotre), राहणार खारदांडा याने बीएमसी अधिकारी असल्याचे सांगून फिर्यादी मंजू राकेश जैन (वय 63 वर्ष) यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या घरात चाललेले नूतनीकरणाचे काम बेकायदा असल्याचे म्हणाला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्याकडून 10 हजारांची लाच मागितली. 11 नोव्हेंबर रोजीची ही घटना आहे.

 

फिर्यादी घरी असताना अक्षय धोत्रे (Mumbai Crime) हा त्याच्या घरी बीएमसीच्या ईस्ट वार्ड अंधेरी पश्चिम मेंटेनन्स विभागाचा अधिकारी म्हणून आला.
त्याच्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर पद्धतीने नूतनीकरणाचे काम चालू असल्याची माहिती त्याला मिळाल्याने तो आला आहे,
असे तो फिर्यादीला म्हणाला. या बेकायदेशीर कामावर कारवाई न करण्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून दहा हजार रुपयाची मागणी केली.
पण फिर्यादीने कसले ही पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी अक्षय याने फिर्यादीना धक्का देऊन जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून घेण्याचा प्रयत्न केला.
पण त्या ठिकाणी मंजू जैन यांचा घरगडी त्यांच्या मदतीला आल्याने आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला.

 

फिर्यादी मंजू राकेश जैन (Manju Rakesh Jain) (रा. फ्लॅट नंबर 701, ए विंग, आयर्लंड पार्क सोसायटी,
लोखंडवाला, अंधेरी पश्चिम) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलीसांनी आयपीसी (IPC) कलम 393, 170, 420 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mumbai Crime | mumbai police crime news bogus bmc officer demanded a bribe of 10000 then attempted theft case was registered against accused

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मौज-मजा करण्यासाठी महागड्या दुचाकी चोरणारा दत्तवाडी पोलिसांच्या जाळ्यात, 4 दुचाकी जप्त

Rajan Salvi | ‘…तर रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही’ – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी

Nana Patole On Devendra Fadanvis | ‘देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार राहिला नाही…”; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

 

Related Posts