IMPIMP

Mumbai High Court On Abortion | मुंबई उच्च न्यायालयाने दिली सशर्त गर्भपाताची परवानगी

by nagesh
Pune Crime News | Bombay High Court granted bail to the accused in the serial bomb blast case in Pune's Jungli Maharaj Road area

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai High Court On Abortion | भारतात गर्भपाताचे कायदे कडक असून, २४ आठवड्यांच्या पुढे गर्भपात करण्याची परवानगी नाही. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला २७ आठवड्यांत गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. तिने केलेल्या दाव्यानुसार महिलेने या बाळास जन्म दिला तर त्याला मार्शल सिंड्रोम नावाचा असाध्य आजार होऊ शकतो. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तिला सशर्त गर्भपाताची परवानगी दिली आहे. त्यानुसार जर बाळ जन्माला आल्यानंतर जिवंत राहण्याची शक्यता असेल, तर तिला गर्भपात करता येणार नाही. (Mumbai High Court On Abortion)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जोडप्याने केलेल्या याचिकेनुसार, या जोडप्यांमध्ये जनुकीय समस्या आहे. त्यामुळे त्यांचे पहिले अपत्यसुद्धा या दुर्मीळ व दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. आता सदर महिला दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर सध्याच्या गर्भालासुद्धा असा दुर्धर आजार होण्याची शक्यता आहे. असा संशय डॉक्टरांना असल्याने त्यांनी दोघांना जनुकीय चाचणी करण्यास लावली. या जनुकीय चाचणीच्या अहवालानुसार गर्भाच्या पित्याच्या जनुकात मार्शल सिंड्रोम या आजाराचे बीज असल्याचे स्पष्ट झाले. (Mumbai High Court On Abortion)

 

त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना गर्भपाताचा सल्ला दिला, पण गर्भाला २७ आठवडे झाल्याने गर्भपात करणे कायदेशीररित्या मान्य नव्हते, २४ आठवड्यांनंतर गर्भपातासाठी न्यायालयीन परवानगी घ्यावी लागते.
त्यामुळे त्यांनी न्यायालयात परवानगी घेण्यासाठी याचिका केली आहे.
या याचिकेवर सुनवाई झाली असून, कायद्याप्रमाणे सोलापूर शासकीय महाविद्यालयात तज्ज्ञ समिती स्थापन
केली आहे. या समितीचा अहवाल सोमवारी सादर होईल, त्यानंतर न्यायालय आपला निर्णय घेईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mumbai High Court On Abortion | Bombay High Court allowed conditional abortion

 

हे देखील वाचा :

Entertainment News | 2022 मध्ये ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी संपवलं त्यांचं नातं

Akshay kumar | अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटावर पाकिस्तानी चाहत्याचा आक्षेप

2nd ODI IND vs BAN | टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

 

Related Posts