IMPIMP

Nana Patole | नाशिक पदवीधर प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भाजपवर जळजळीत प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Nana Patole On Shinde-Fadnavis Govt | 'Started immediately in ministry for fear of government collapse'; Indicative statements of nana patole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे पिता-पुत्रांच्या बंडखोरीवरून सध्या भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चांगलेच वाक् युध्द सुरू आहे. त्यातच पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला. यावेळी बोलताना त्यांनी (Nana Patole) भाजपवर अतिशय कठोर शब्दात टीका केली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पाचही जागांबाबत स्पष्टीकरण यावे, यासाठी आज दुपारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यावेळी पाचही जागांबाबत चित्र स्पष्ट होईल. तसेच या निवडणुकीत कुणाचा पराभव होणार हे ३० तारखेला मतदाना दिवशीच ठरेल. तसेच विधानपरिषदेचा निकाल २ फेब्रुवारी रोजी लागणार आहे, तेव्हा सर्वांना कळून येईलचं. असे यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले.

 

तसेच त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘भाजपाने घर फोडण्याचं काम केलं आहे. घर फोडणं ही त्यांची आता परंपराच झाली आहे. नाशिकमध्ये त्यांना स्वतःचा उमेदवार मिळू नये, यावरुन भाजपाची काय स्थिती झाली, हे लक्षात येतं. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सुशिक्षित लोक मतदान करत असतात. राज्यात सध्या बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे. सुशिक्षित लोक मतदानातून याबाबत भाजपाला उत्तर देतील.’ असेही यावेळी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (दि.१९) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
यावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, ‘काही दिवसांपूर्वी जी- २० ची परिषद झाली तेव्हा मुंबईला सजविण्याचे काम झाले. विमानतळाच्या आजूबाजूला झोपडपट्टी झाकण्यासाठी मोठ मोठे बॅनर लावले होते.
त्यावर नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले होते.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाला येत आहेत.
पण आठ वर्षांपूर्वी त्यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन केले होते,
त्या प्रकल्पाचे काय झाले? यावर बोलले पाहीजे.’ असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून देखील त्यांनी जोरदार टीका केली. दावोसला अनेकदा आपले नेते गेले आहेत.
त्यामुळे तेथून किती गुंतवणूक येते, हे सर्वांनाच माहित आहे.
तेथे एक लाख कोटीचे करार केले काय किंवा दहा लाख कोटींचे करार केले काय, त्याला काहीच अर्थ नसतो.
उलट गुजरातला गेलेले प्रकल्प आणि रोजगार सत्ताधाऱ्यांनी परत आणून दाखवावेत.
असा इशारा देखील यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) दिला.

 

 

Web Title :- Nana Patole | nana patole criticized maharashtra bjp on satyajeet tambe candidature in nashik graduate election

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | नोकरीच्या आमिषाने पॅकेज घेण्यास भाग पाडून तरुणांची केली जातेय फसवणूक; डेक्कन जिमखान्यावरील सीकेवाय, केकेवाय कंपनीच्या कर्मचार्‍यांवर गुन्हा

Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना

Pune Crime News | रणजित रामगुडेबरोबर फिरतो म्हणून तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

 

Related Posts