IMPIMP

Nandurbar Malnutrition News | नंदुरबारमध्ये सप्टेंबर महिन्यात 118 बालकांचा मृत्यू; प्रशासनाला ना सोयर ना सुतक

by nagesh
Maternity Leave | 60 day special maternity leave to female staff in case of death of a child soon after birth centre

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइन Nandurbar Malnutrition News | सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून (Nandurbar Malnutrition News) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये शून्य ते सहा वयोगटातील 118 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे एवढी गंभीर घटना असतानाही प्रशासनाला याचे गांभीर्यच नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्याच्या सरासरी दरापेक्षा हा मृत्यूदर दुप्पट असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

जिल्ह्यात असणाऱ्या 12 प्रकल्पांमध्ये सप्टेंबर महिन्यात दोन हजार 992 बालकांचा जन्म झालं आहे. तर 118 बालकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शून्य ते 28 दिवसांचे 37, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील 38, एक वर्ष ते पाच वर्षे वयोगटातील 20 आणि उपजत 23 बालकांचा समावेश आहे. याशिवाय सहा मातांचाही मृत्यू झाला आहे. शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा मृत्यूदर राज्यात सरासरी हजारी 21 आहे. मात्र, जिल्ह्यात (Nandurbar Malnutrition News) सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण पाहिले तर मृत्यूदर दुप्पट झाल्याचे दिसते. नवापूर बालविकास प्रकल्पात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत तेथे 22 बालकांचा मृत्यू झाला असून तोरणमाळ प्रकल्पात 16, अक्कलकुवा प्रकल्पात 15 बालकांचा मृत्यू झाला आहे. कागदावरच कुपोषित बालकांची संख्या घटवली जात असल्याचे या घटनेवरून समोर (Nandurbar Malnutrition News) आले आहे. सर्वेक्षणात बालकांची संख्या वाढते. मात्र त्यानंतर दर महिन्याला कमी होत जाते. एकूणच हा सर्व प्रकार संशयास्पद आहे.

 

भगदरी (ता. अक्कलकुवा) राज्यपालांनी दत्तक घेतले आहे.
मात्र याच गावात चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका येत नाहीच पण पॊषण आहारही वितरित करण्यात आला नाही.
यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. गावात ज्यावेळी आरोग्य तपासणी झाली त्यावेळीही त्या उपस्थित नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान या संदर्भात चौकशीसाठी स्थानिक अधिकारी गावात आले पण कुठलीही कार्यवाही झाली नाही.

 

Web Title :- Nandurbar Malnutrition News | 118 infant deaths nandurbar month due malnutrition

 

हे देखील वाचा :

Digital Transaction On Whatsapp | बँक अकाऊंट लिंक न करता सुद्धा व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

Benefits of Black Pepper Tea | पोटाची चरबी कमी करायची असेल तर प्या काळी मिरीचा चहा, होतात अनेक जबरदस्त फायदे

Pune Crime | पुण्यात वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी गाडी घेऊन जाऊन केली फसवणूक

 

Related Posts