IMPIMP

Narayan Rane | पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut criticizes narayan rane for commenting on saamana editorial

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Narayan Rane | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नुकतंच ईडीने (ED) कारवाई केली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली. राऊतांवर केलेल्या कारवाईवरून मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आज शिवसेनेकडून (Shiv Sena) शक्तिप्रदर्शन केले जात आहे. त्यावेळी दिल्लीहून मुंबईत दाखल झालेल्या संजय राऊतांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. यानंतर आता भाजप नेते (BJP Leader) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) देखील संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ”कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा ? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर ?” अशा शब्दात नारायण राणेंनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

 

 

संजय राऊत काय म्हणाले ?
”तुम्ही आमचं काय करणार ? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा आमच्यावर हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण यापुढचे 25 वर्ष तुमचं राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खणली आहे. राजकीय विरोधक विचारानं सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही,” असं सजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Narayan Rane | BJP leader and union minister narayan rane on shivsena leader and MP sanjay raut

 

हे देखील वाचा :

Rekha Jare Murder Case | बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ! जामीन अर्ज फेटाळून नोंदवले महत्वाचे निरीक्षण

Pune Municipal Corporation (PMC) | पहिल्या निविदेचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच ‘त्या’ कामाची निविदा प्रक्रिया राबवा; खातेप्रमुखांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमारांचा आदेश

Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’शिवाय आणखी ‘ही’ दोन नावे, चर्चांना उधाण

 

Related Posts