IMPIMP

Rekha Jare Murder Case | बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ! जामीन अर्ज फेटाळून नोंदवले महत्वाचे निरीक्षण

by nagesh
Rekha Jare Murder Case | aurangabad bench of the bombay mumbai high court today rejected the bail plea of bal alias balasaheb jagannath bothe patil in the murder case of social activist rekha jare nagar

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइनRekha Jare Murder Case | सामाजिक कार्यकर्त्या (Social Activist) रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील (Rekha Jare Murder Case) मुख्य आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील (Bal alias Balasaheb Jagannath Bothe Patil) याचा जामीन अर्ज (Bail Application) मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) आज फेटाळला. न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर (Justice M.G. Shevalikar) यांनी हा निर्णय दिला. समोर आलेल्या कागदपत्रांनुसार आरोपीविरुद्ध अनेक सबळ पुरावे (Evidence) असल्याचे दिसून येते, त्यामुळे जामीन फेटाळण्यात (Bail Rejected) येत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर 2020 रोजी खून (Rekha Jare Murder Case) झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बोठे याला 13 मार्च 2021 रोजी अटक (Arrest) करण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. आरोपी बोठे याने 14 जुलै रोजी नगरच्या सत्र न्यायालयात (Ahmednagar Sessions Court) नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर (District Judge M.V. Kurtadikar) यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले (Adv. Mahesh Tawale) तर सरकारच्या वतीने अ‍ॅड. उमेशचंद्र यादव (Adv. Umesh Chandra Yadav) यांनी बाजू मांडली. 23 सप्टेंबरला जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) अर्ज फेटाळून लावला. समोर आलेल्या पुराव्यांवरुन आरोपीचे वर्तन संशयास्पद असल्याने त्याचा या गुन्ह्यात सहभाग दिसून येत आहे. यामुळे आरोपीचा जामीन फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

 

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बोठे याने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज केला. याठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे सुनावणी लांबवणीवर पडली. 28 फेब्रुवारीला त्यावर न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांच्यासमोर युक्तिवाद सुरु झाला. सरकारी वकील डी. आर. काळे (Lawyer d. R. Kale) यांनी सरकारची बाजू मांडली. तर मूळ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. एन. बी. नरवडे (Adv. N.B. Narwade) व अ‍ॅड. एस. पटेकर (Adv. S. Patekar) यांनी काम पाहिले. आज या प्रकरणावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने बोठे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रवादीच्या (NCP) महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांचा 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी नगर – पुणे महामार्गावरील (Nagar-Pune Highway) जातेगाव घाटात (Jategaon Ghat) गळा चिरून खून करण्यात आला होता.
सुरुवातीला हे प्रकरण गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन खून झाल्याचे समोर आले.
मात्र, त्यानंतर हा कट रचून, सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे समोर आले.
या गुन्ह्यात पत्रकार बोठे हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले.
यानंतर बोठे याने अटकपूर्व जामीनासाठी (Pre – Arrest Bail) बरेच प्रयत्न केले. यासाठी तो अनेक दिवस फरार होता.
मात्र, पोलिसांनी तपास करुन त्याला बेड्या ठोकल्या.

 

Web Title :- Rekha Jare Murder Case | aurangabad bench of the bombay mumbai high court today rejected the bail plea of bal alias balasaheb jagannath bothe patil in the murder case of social activist rekha jare nagar

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | पहिल्या निविदेचा कार्यकाळ संपण्यापुर्वीच ‘त्या’ कामाची निविदा प्रक्रिया राबवा; खातेप्रमुखांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमारांचा आदेश

Yashwant Jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’शिवाय आणखी ‘ही’ दोन नावे, चर्चांना उधाण

Amruta Fadnavis | संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावरुन अमृता फडणवीसांचा निशाणा; म्हणाल्या – ‘मला मध्यमवर्गीय माणसाची व्याख्या सांगाल का ?’

 

Related Posts