IMPIMP

Pune Crime News | हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

by sachinsitapure
Pune Crime News | Facebook account holder booked for posting objectionable content against Hindu gods, India

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हिंदू देवी, देवतांविषयी, महापुरुषाविषयी आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) करुन त्यांची बदनामी करणार्‍याविरोधात विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

जगदीश काबरे (रा. सांगली) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

याबाबत सच्चित शामदत्त एरंडे (वय ३७, रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७३/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगदीश काबरे याने फेसबुक अकाऊंटवर जेट जगदीश, जगदीश काबरे, जे के या नावाने उघउलेल्या अकाऊंटवरुन हिंदु देवी देवतांविषयी, महापुरुषांविषयी, साधु संताविषयी आणि भारत मातेविषयी आक्षेपार्ह पोस्ट (Facebook Offensive Posts) करुन त्यांची बदनामी केली. हिंदु धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे (Sr PI Vitthal Dabade) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Facebook account holder booked for posting objectionable content against Hindu gods, India

Related Posts