IMPIMP

CM Eknath Shinde | शिवसेनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, जिल्हाप्रमूखाचा शिंदे गटात प्रवेश

by nagesh
CM Eknath Shinde | ncp district chief cm eknath shinde joined the group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपाच्या (BJP) मदतीने शिवसेनेत उभी फुट पाडून राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे अजूनही शिवसेनेचे (Shivsena) नेते, पदाधिकारी यांना आपल्या गटात आणण्याचे सत्र सुरूच आहे. आता मात्र शिंदे यांची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP)  सुद्धा पडल्याचे दिसत आहे. शिवसेनेनंतर शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याचे काम सुरू केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेष म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. म्हात्रे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या (Bhiwandi Lok Sabha Constituency) संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली, तसे नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले. शिंदे गटाने आता राष्ट्रवादीत फोड काम सुरू केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे.

 

याप्रसंगी शिंदे गटाचे कॅप्टन अभिजित अडसूळ (Captain Abhijit Adsul), माजी आमदार अशोक पाटील (Former MLA Ashok Patil), ठाणे जिल्हाप्रमुख, प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के (Naresh Mhaske), उपनेते प्रकाश पाटील (Prakash Patil), प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Spokesperson Sheetal Mhatre), माजी आमदार पांडुरंग बरोरा (Former MLA Pandurang Barora), शहापूर शहरप्रमुख आकाश सावंत (Akash Sawant) तसेच मुरबाड-शहापूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नवी मुंबईतील उलवे परिसरात शिवसेनेला मोठा धक्का शिंदे गटाने दिला आहे.
उरण मतदार संघाचे कार्यकर्ते काल दुपारी उध्दव ठाकरेंना भेटायला गेले आणि रात्री त्याच कार्यकर्त्यांनी अचानक
शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला. उलवे शहर प्रमुख, शाखा प्रमुख, महिला शहर प्रमुख,
महिला शाखा प्रमुख यांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | ncp district chief cm eknath shinde joined the group

 

हे देखील वाचा :

Girish Mahajan | खडसेंना लाख वाटते, की त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, पण…, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना टोला

Eknath Khadse | रश्मी शुक्ला फडणवीसांच्या बंगल्यावर गेल्या त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळाली, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics | कोकणातील शिवसेनेचे ‘हे’ माजी आमदार करणार भाजपामध्ये प्रवेश, सेनेला आणखी एक धक्का

 

Related Posts