IMPIMP

Omicron Covid Variant | ओमायक्रॉनचा संसर्ग प्रत्येकालाच होण्याची शक्यता; वैद्यकीय तज्ज्ञांचा धक्कादायक दावा

by nagesh
Omicron Variant Alert | omicron variant alert omicron variant is spreading rapidly because of this and covid 19 health tips

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Omicron Covid Variant | काही दिवसांपासून ओमायक्रॉन चे रुग्ण (Omicron Covid Variant) वाढू लागले आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखणे आता शक्य नसल्याचे दिसत आहे. प्रत्येकालाच याचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना (Coronavirus) घातक आजार राहिला नाही. नव्या व्हेरिएंट ची लक्षणे सौम्य असून बऱ्याच जणांना रुग्णालयात दाखलही करण्याची आवश्यकता नाही, असे मत आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश मुलियाल (Dr. Jayaprakash Muliyil) यांनी व्यक्त केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डॉ. जयप्रकाश मुलियाल म्हणाले, ‘ओमायक्रॉन बाबतची भीती मनातून दूर केली पाहिजे. या आजाराचा आपण सामना करू शकतो. जवळपास 80 टक्के लोकांना याचा संसर्ग झाला असल्याचे समजणार ही नाही. त्यामुळे याबाबतची मनातील भीती दूर करून या आजारासोबत जगायला आपण शिकले पाहिजे. कोरोनावरील लस बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून देण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा नव्या व्हेरिएंटला प्रभावी अशी लस तयार करून ती देने अधिक चांगले ठरेल,” असेही डॉ. जयप्रकाश मुलियाल (Dr. Jayaprakash Muliyil) यांनी म्हटले. (Omicron Covid Variant)

 

ही महामारी बूस्टर डोस रोखू शकत नाही –
कोणत्याही वैद्यकीय संस्थेने व सरकारच्या सल्लागारांनी बूस्टर डोस (Booster Dose) देण्याचा सल्ला दिलेला नाही, असे स्पष्ट करत मुलियाल म्हणाले की, ”प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या वृद्ध व्यक्तींचा विचार करून हा सल्ला दिला गेला आहे.
बाधितांची संपर्कात आल्यास आणि लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.
नव्या व्हेरिएंटची रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट होत आहे.
अशा परिस्थितीत संपर्कातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याने काहीही साध्य होणार नाही.
ज्या वेगाने साथीचा फैलाव होत आहे त्या वेगाने चाचण्या करणे शक्य होणार नसून त्याची आवश्यकताही नाही.”

आपण जास्त काळ घरात कोंडून राहू शकत नाही. ओमायक्रॉनचा प्रभाव डेल्टा व्हेरिएंट पेक्षा खूपच सौम्य आहे. लस देशात येईपर्यंत 85 टक्के लोकांना संसर्ग झाला होता. लसीचा पहिला डोस हा पहिल्या बूस्टर डोससारखा होता कारण बहुतेक भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकार शक्ती होती, असेही डॉ. जयप्रकाश मुलियाल म्हणाले.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Omicron Covid Variant | omicron Covid variant covid 19 Corona almost unstoppable and everyone will eventually be infected it top

 

हे देखील वाचा :

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Crime | पुण्यात बुली बाईसारखा प्रकार? ओळखीच्या मुलींचे चेहरे नग्न महिलांच्या चेहर्‍यावर लावून बनवले अश्लिल फोटो अन्…

Ring Road in Pune | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! पुण्यासाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर

Paytm Share Price | सतत घसरतोय पेटीएमचे शेयर, का खाली जाताहेत ‘हे’ स्टॉक, गुंतवणुकदारांनी आता काय करावे

 

Related Posts