IMPIMP

Paytm Share Price | सतत घसरतोय पेटीएमचे शेयर, का खाली जाताहेत ‘हे’ स्टॉक, गुंतवणुकदारांनी आता काय करावे

by nagesh
Paytm Share Price | paytm share price falling continuously why this stock is downfall

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPaytm Share Price | पेटीएमचे शेअर्स सध्या सातत्याने घसरत आहेत. आज, बुधवारी हा शेअर 1000 रुपयांच्या दिशेने जाताना दिसत आहे. आज दुपारी हा स्टॉक (Paytm Share Price) 40 रुपयांपेक्षा जास्त घसरणीसह (-3.63%) 1,079.00 वर ट्रेडिंग करत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Paytm ची मूळ कंपनी One 97 Communications ने लिस्टिंगच्या 50 दिवसांच्या आत आपला इश्यू 2150 रुपयांवरून घसररून 1100 रुपयांपर्यंत खाली आला आहे. म्हणजे त्याची किंमत निम्म्याहून कमी झाली आहे.

 

सध्या, कंपनीचे शेअर्स (Paytm Share Price) 52 आठवड्याच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. गेल्या एका महिन्यात हा शेअर जवळपास 30 टक्क्यांनी घसरला आहे. कंपनीचे शेअर्स 18 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. पण या शेअर्सने त्यांच्या इश्यू प्राइसला कधीच गाठू शकला नाही. या स्टॉकचा उच्चांक 1961 रुपये होता जो लिस्टिंगच्या दिवशीच होता.

 

का घसरत आहे शेअर
अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी हा शेअर रेटिंग कमी करून विकण्याचा सल्ला दिला आहे. म्युच्युअल फंडांनीही आपले पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास या शेयरबाबत डळमळीत होऊ लागला आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मॅक्वेरी इंडियाने लक्ष्य 25% पर्यंत कमी केले
इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म मॅक्वेरी सिक्युरिटीज इंडियाने (investment banking firm Macquarie Securities India) पेटीएमच्या शेअर्सचे लक्ष्य 25 टक्क्यांनी कमी केले.

 

मॅक्वेरीने म्हटले आहे की कंपनीची भविष्यातील वाढ पूर्वीच्या अंदाजापेक्षा वाईट असू शकते. या अंदाजानंतर सोमवारी या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली.

 

ब्रोकरेज फर्मने स्टॉकचे लक्ष्य आधीच्या रु. 1,200 वरून 25 टक्क्यांनी कमी करून 900 रुपये केले.
याचा अर्थ 7 जानेवारीला बंद शेयरच्या किंमतीपासून ते 28 टक्क्यांनी आणखी घसरण्याची शक्यता आहे.
मॅक्वेरीने स्टॉकवर आपले ’अंडरपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवले.
कंपनीचा शेअर 18 नोव्हेंबर रोजी 1,955 रुपयांच्या उच्चांकावरून 38 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

 

 

एचडीएफसी म्युच्युअल फंडाने भाग भांडवल कमी केले
एचडीएफसी म्युच्युअल फंडाने (HDFC Mutual fund ) पेटीएममधून आपला हिस्सा कमी केला आहे.

 

मंथली पोर्टफोलिओ डिसक्लोजरमधून ही माहिती समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी घसरण झाली.
चार अँकर गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या HDFC म्युच्युअल फंडाने डिसेंबरच्या अखेरीस आपल्या दोन योजनांमध्ये पेटीएमचा हिस्सा कमी केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका मोठ्या फंड मॅनेजरने सांगितले की मोठा फंड हाऊस सहसा कंपनीतून बाहेर पडतो तेव्हाच फंड मॅनेजरला कळते की त्याने चुकीच्या किंमतीच्या पातळीवर प्रवेश केला आहे.
आणि त्यात आणखी घसरण होऊ शकते. जेव्हा फंड व्यवस्थापकांना वाटते की नजीकच्या भविष्यात स्टॉक कमी किमतीत व्यवहार करू शकतो, तेव्हा ते लॉस बुक करतात आणि स्टॉकमधून बाहेर पडतात.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :-  Paytm Share Price | paytm share price falling continuously why this stock is downfall

 

हे देखील वाचा :

Hemant Birje | बॉलीवूडचे ‘टार्जन’ हेमंत बिर्जेच्या कारला ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर अपघात; बिर्जे व पत्नी जखमी

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात ‘वसुली’साठी ‘चंदननगर’च्या हवालदाराकडून रात्री उशिरा ‘तोडपाणी’ ! महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

Pune Crime | पोलीस भरतीत डमी उमेदवाराला परीक्षा देण्यास लावणार्‍या तरुणाला अटक; फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा

 

Related Posts