IMPIMP

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

by nagesh
Pankaja Munde | pankaja munde photo omitted from devendra fadnavi welcome banner in aurangabad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) नुकताच झाला. मात्र, मंत्रिमंडळात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा समावेश नसल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात एकीकडे मित्रपक्षांतून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असताना दुसरीकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, त्याचवेळी आपल्याला मंत्रीपद न मिळाल्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कार्यकर्त्यांना मी शांत केलं

पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण नाराज नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी नाराज आहे असं काहीही नाही. मी नाराज कशामुळे होणार ? उगीचच नाराज नाराज म्हणायचं. पण माझे कार्यकर्ते नाराज आहे हे खरं आहे. त्यांनी ती नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यांना मी शांत केलं आहे. त्यांना दु:ख वाटत असेल. पण ते दु:ख वाटणारच. ते साहजिकच आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

संघर्ष व्यक्तीविरुद्ध नाहीतर प्रवृत्तीविरुद्ध

मी मंत्री असताना सुद्धा खूप संघर्ष केला आहे. किती आरोपांना (Allegation) सामोरे गेले. किती संघर्षांना सामोरे गेले.
मंत्री असताना माझा एक दिवस सुखाचा बघितला आहे का तुम्ही ? हा संघर्ष कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही, तर प्रवृत्तीविरुद्ध आहे.
हा संघर्ष माझा सुरुच राहणार आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

 

माझा तर मुंगीचा देखील वाटा नाही

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालं याचा आनंद आहे.
मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते त्यामुळे खोटं श्रेय मी घेणार नाही.
शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय, माझा मुंगीचा देखील वाटा नाही.
या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळात समावेश न केल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio

 

हे देखील वाचा :

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

 

Related Posts