IMPIMP

शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! PM Kisan योजनेचा 11 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार

by nagesh
PM Kisan 12th Installment | people associated with pm kisan yojana will not get benefits in these 10 conditions know in detail PM Kisan 12th Installment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | देशातील शेतक-याला आर्थिक सहाय्य व्हावे या उद्देशाने केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government)
शेतक-यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली. याचा लाभ अनेक कोट्यवधी शेतकरी
(Farmers) घेत आहेत. दरम्यान आता शेतकरी या योजने अंतर्गत अकराव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे आता देशातील बारा कोटी 50 लाख
लाभार्थी शेतक-यांच्या खात्यावर यंदा मे महिन्यात 11 वा हप्ता जमा होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक खूशखबर आहे. (PM Kisan)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्‍य सरकारांनी (State Government) पात्र शेतकऱ्यांच्‍या रिक्वेस्ट फॉर ट्रान्स्फर (RFT) वर स्वाक्षरी केली आहे. दरम्यान, अक्षय्य तृतीयेला अर्थात 3 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः हा हप्ता जारी करतील अशी अपेक्षा आहे. कारण मागील वर्षी देखील 15 मे रोजी हप्ता जारी करण्यात आला होता. अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आली आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा केले जाते. 2 हजारच्या 3 हप्त्यात ही रक्कम दिली जातेय. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

 

 

ई-केवायसी अनिवार्य –

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केले आहे. त्यामुळे 11 व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य आहे. दरम्यान, ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख देखील सरकारने 31 मे पर्यंत वाढवली आहे.

 

 

Web Title : PM Kisan | pm kisan samman nidhi rft signed for pm kisan 11th installment pm modi may issue on 3rd may

 

हे देखील वाचा :

Bachhu Kadu On Navneet Ravi Rana | राणा दांपत्याला मंत्री बच्चू कडूंचा कडक इशारा, म्हणाले – ‘वाघाची नखं अजूनही…’

Death In Police Custody Case | आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Navneet Kaur Rana Vs Shivsena | नवनीत राणांना अडवण्यासाठी शिवसेनेची ‘खास’ फिल्डिंग; पहाटेपासून CSMT वर गर्दी

 

Related Posts