IMPIMP

PM Modi | ना सुरक्षेची उपाययोजना, ना ट्रॅफिक थांबवली; दिल्लीच्या रस्त्यावर सामान्य माणसाप्रमाणे निघाले PM मोदी (व्हिडिओ)

by nagesh
PM Modi | when pm modi left for nowshera minimal security arrangements and no traffic restrictions were in place on the route in delhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाप्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली परंपरा कायम ठेवत दिपोत्सवानिमित्त पीएम मोदी (PM Modi) गुरुवारी जम्मू- काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पोहचले आणि भारतीय लष्कराच्या जावानांची भेट घेतली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पीएम मोदी (PM Modi) यांचा ताफा जेव्हा दिल्लीहून नौशेरासाठी निघाला तेव्हा दिल्लीच्या रस्त्यावर असामान्य दृष्य पहायला मिळाले.
दिल्लीच्या रस्त्यावर सुरक्षेशिवाय आणि कोणत्याही ट्रॅफिक रिस्ट्रिक्शनशिवाय पीएम मोदींचा ताफा जाताना दिसला.

 

 

वृत्तसंस्था एएनआयने हा व्हिडिओ सुद्धा जारी केला आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की, आज जेव्हा पीएम मोदी जम्मू-काश्मीरच्या नौशेरासाठी रवाना झाले तेव्हा दिल्लीत रस्त्यावर सुरक्ष नव्हती आणि कोणताही वाहतूक प्रतिबंध नव्हता. या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे की, सामान्य गाड्यांप्रमाणेच पीएम मोदी यांचा ताफा जात आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

केंद्रशासित प्रदेशाच्या सीमावर्ती भागात अलिकडेच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.
अधिकृत सूत्रांनी नौशेरामध्ये लष्कराच्या चौकीवर उपस्थित पंतप्रधानांची छायाचित्रे शेयर केली. येथे मोदींनी जवानांची भेट घेतली
आणि नंतर ड्यूटीदरम्यान शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

पीएम मोदी (PM Modi) यांनी जवानांनासोबत दिवाळी साजरी केल्याने त्यांचे मनोबल वाढले.
ऑक्टोबरमध्ये भारतीय लष्काराने दक्षिण पीर पांजालमध्ये 11 जवान गमावले आहेत.
या क्षेत्रात अचानक दशहतवाद वाढला आहे. कलम 370 हटवल्याच्या दुसर्‍या वर्धापनदिनानंतर 6 ऑगस्टला या भागात एन्काऊंट झाले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : PM Modi | when pm modi left for nowshera minimal security arrangements and no traffic restrictions were in place on the route in delhi

 

हे देखील वाचा :

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात करून किती मिळाला दिलासा? वाढीच्या तुलनेत किरकोळ आहे घसरण, जाणून घ्या पूर्ण गणित

Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरण : वसुलीची रक्कम हवालामार्फत देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध 27 कंपन्या वळवल्याचा ED ला संशय

Jandhan Account | SBI, PNB सह ‘या’ 6 बँकांमध्ये असेल जनधन खाते तर अशाप्रकारे चेक करा बॅलन्स, जाणून घ्या पद्धत?

 

Related Posts