IMPIMP

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

by pranjalishirish
Police officer sachin vaze translated to control

मुंबई : वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे sachin vaze  यांची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, ही पद्धत तपासाची पद्धत नाही. कुणीही तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचे आणि त्याला आयुष्यातून उठवायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे. सचिन वाझे sachin vaze हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्र तयार केले जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सचिव वाझे २००८ मध्ये शिवसेनेत होते, त्यानंतर त्यांचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही असेही मुख्यमंत्र्यांनी नुकतेच सांगितले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा व ठाणे येथील मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या घटनेचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे. मनसुख यांची आत्महत्या कि हत्या याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

सचिन वाझे sachin vaze हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केले होते.

मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. यामध्ये सचिन वाझेही sachin vaze या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. या घटनेनंतर वाझे यांनी 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र, तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी 2008 च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला होता.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात च

Related Posts