IMPIMP

Popular Front of India (PFI) | PFI वर दुसरी मोठी कारवाई ! 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे; 170 जण ताब्यात, पुण्याच्या कोंढाव्यातून 6 जणांची धरपकड

by nagesh
Popular Front of India (PFI) | big crackdown on pfi once again raids on 200 locations in 7 states more than 170 people in custody, 6 detained from pune kondhwa

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India (PFI) विरोधात तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई सुरु
आहे. मंगळवारी (दि.27) सकाळच्या सुमारास तब्बल 7 राज्यांमध्ये पोलिसांनी छापे (Police Raid) टाकले. आत्तापर्यंत सुमारे 170 जणांना ताब्यात
घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी (Inquiry) सुरु आहे. यापूर्वी NIA आणि ED ने 13 राज्यांत छापे टाकून 100 अधिक पीएफआय (Popular
Front of India (PFI) कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांना निधी उपलब्ध (Terrorists Funding) करुन देण्यासंदर्भात छापे टाकले जात
आहेत. दरम्यान, पुण्याच्या कोंढवा परिसरातून 6 ते 7 जणांना ताब्यात घातल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माध्यमांतील वृत्तानुसार, सध्या पोलीस उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), गुजरात (Gujarat), आसाम (Assam), कर्नाटक (Karnataka), दिल्ली (Delhi) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) तपास करत आहेत. हिंसक निदर्शनांच्या नियोजनासंदर्भात इनपुट मिळाल्यानंतर छापे टाकण्यात आले. वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजेपर्यंत 7 राज्यात 200 ठिकाणांवर छापे टाकून 170 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

 

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी एजन्सिज, भाजप (BJP) तसेच RSS च्या नेत्यांना आणि संघटनेला निशाणा बनवण्याचा पीएफआयचा (Popular Front of India (PFI) प्लॅन होता.
असे एका इंटेलिजन्स नोटमध्ये (Intelligence Note) समोर आला आहे.
या नोटनुसार, आपल्या वरिष्ठ नेत्यांना नवी दिल्लीतील तिहार जेलमध्ये (Tihar Jail) ठेवल्यामुळे पीएफआय कार्यकर्ते नाराज आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच सरकारला प्रत्युत्तर म्हणून पीएफआयने हिंसक कारवाईच निर्णय घेतल्याचेही या नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, यासाठी पीएफआयने ‘बयाथीस’चा मार्ग निवडला आहे.
बयाथीस हा एक अरबी शब्द असून याचा अर्थ ‘मौत का सौदागर’ किंवा ‘फिदायीन’ असा होतो.

 

Web Title :- Popular Front of India (PFI) | big crackdown on pfi once again raids on 200 locations in 7 states more than 170 people in custody, 6 detained from pune kondhwa

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात सहा दिवसाच्या लेकीची निर्दयी बापाने केली तृतीयपंथीयांना विक्री

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, मुंबई हायकोर्टाला दिले आदेश, म्हटले – तातडीने सुनावणी घेत निर्णय…

 

Related Posts