IMPIMP

Post Office मध्ये सुद्धा मिळते Net Banking ची सुविधा, घरबसल्या करू शकता ट्रांजक्शन, जाणून घ्या कसे करू शकता अ‍ॅक्टिव्ह

by nagesh
Post Office Net Banking | net banking facility available in the post office you can do transactions sitting at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Net Banking | पोस्ट ऑफिसमध्ये देशातील एक मोठा वर्ग गुंतवणूक करतो (Investment In Post Office). याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये मिळत असलेले चांगले व्याज आणि गुंतवणुकीची सुरक्षितता. मात्र, सरकारने नुकताच नियम लागू केला आहे की, एखादी बँक बुडाली तर त्यात केलेल्या गुंतवणुकीतून केवळ 5 लाख रुपयेच दिले जातील. तर पोस्ट ऑफिसमध्ये केलेली 100% गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते आणि त्यावर चांगले व्याजही मिळते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इंटरनेट बँकिंग आल्यानंतर बँकांमध्ये अनेक सुविधा ग्राहकांना मिळाल्या. ज्यामध्ये ग्राहक घरी बसून एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. याशिवाय ग्राहक चेकबुक (Cheque Book), एटीएम कार्ड (ATM Card), क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि कर्जासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज (Online Loan Application) करू शकतात.

 

अशा स्थितीत बँकांशी स्पर्धा करण्यासाठी पोस्ट ऑफिसनेही आपल्या ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा (Post Office Net Banking) सुरू केली आहे. जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्ही त्यात इंटरनेट बँकिंग (Internet Banking Facility) सुरू करू शकता. यासाठी तुमचे सिंगल किंवा जॉईंट खाते असणे आवश्यक आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

असे अ‍ॅक्टिव्ह करा पोस्ट ऑफिस खात्यात नेट बँकिंग (Activate Net Banking in Post Office Account)

पोस्ट ऑफिस खात्यात नेट बँकिंग सक्रिय करणे खूप सोपे आहे.

यासाठी तुमचे खाते असलेल्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

येथे तुम्हाला अर्ज भरावा लागेल.

यासोबतच पॅन कार्ड, आधार कार्ड, पोस्ट ऑफिस पासबुकसह इतर कागदपत्रांची झेरॉक्स प्रत द्यावी लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोस्ट ऑफिस तुमच्या मोबाईलवर लिंक पाठवेल.

या लिंकमध्ये नवीन पर्याय निवडावा लागेल.

येथे Login चा पर्याय निवडा.

त्यानंतर नेट Banking Password आणि दुसरा Transaction Password सेट करा.

यानंतर पासवर्ड टाकून तुम्ही नेट बँकिंग सुरू करू शकता.

त्यानंतर तुम्ही नेट बँकिंगचा लाभ घेऊ शकता.

 

Web Title :- Post Office Net Banking | net banking facility available in the post office you can do transactions sitting at home

 

हे देखील वाचा :

Tata Group Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअरने दिला दोन वर्षात 10 पट रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा शेअर

Manjit Singh Virdi Foundation | मनजित सिंग विरदी फाऊंडेशनच्या वतीने महिलादिनानिमित्त ‘त्या’ महिलांना दाखवण्यात आला ‘गंगुबाई काठियावाडी’

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 2 वर्षानंतर आता पुन्हा रेल्वे सुरू करणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

 

Related Posts