IMPIMP

Shilpa Shetty-Raj Kundra | काय सांगता ! होय, राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावे केले 5 फ्लॅट; जाणून घ्या किंमत

by nagesh
Shilpa Shetty-Raj Kundra | raj kundra transfers five flats worth 38 5 cr to wife shilpa shetty

सरकारसत्ता ऑनलाइन – Shilpa Shetty-Raj Kundra | हिंदी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj
Kundra) ही जोडी मागील काही महिन्यापासून चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यात पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती.
त्यानंतर राजला जामीन देखील मिळाला. दरम्यान आता आणखी एकदा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा चर्चेचा विषय ठरले आहेत. राज कुंद्राने शिल्पा
शेट्टीच्या नावे फ्लॅट (Flat) केले आहेत. दरम्यान या फ्लॅटची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. (Shilpa Shetty-Raj Kundra)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज कुंद्राने जुहू परिसरातील (Juhu Area) ओशन व्ह्यू या इमारतीतील असणारे 5 फ्लॅट शिल्पा शेट्टीच्या नावे हस्तांतरित केले आहेत. 101, 102, 103, 104 आणि 105 असे या फ्लॅटचे रुम नंबर आहेत. तसेच, राज कुंद्राने कार पार्किंग देखील शिल्पा शेट्टीच्या नावे केले आहेत. दरम्यान, या संपूर्ण फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ 557.17 चौरस मीटर इतके आहे. अशी माहिती स्क्वेअर फिट इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार समोर आलीय. (Shilpa Shetty-Raj Kundra)

 

दरम्यान, राज कुंद्राची दुसरी पत्नी शिल्पा शेट्टी आहे. राजने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. शिल्पा आणि राजने 2009 मध्ये विवाह केला आहे. त्या दोघांना 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. दरम्यान, राजने शिल्पा शेट्टीच्या नावे हस्तांतरित केलेल्या पाच फ्लॅटची किंमत जवळपास 38.5 कोटी रुपये इतकी आहे.

 

Web Title :- Shilpa Shetty-Raj Kundra | raj kundra transfers five flats worth 38 5 cr to wife shilpa shetty

 

हे देखील वाचा :

API To PI Promotions And Transfers | पिंपरी-चिंचवड शहरातील 11 सहायक पोलीस निरीक्षकांची पदन्नोतीने बदली

Gehraiyaan : Ananya Panday | अनन्या पांडेनं ‘गहराइया’ मध्ये दिले ‘खुल्लमखुल्ला’ इंटिमेट सीन्स, पाहून नाराज झाले वडिल चंकी पांडे?

छप्परफाड कमाई ! केवळ 36 पैशांच्या कवडीमोल भावात मिळालेल्या Multibagger Penny Stock ने बनवले करोडपती, एका वर्षात एक लाखावर दिला 2.25 कोटीपेक्षा जास्त रिटर्न

 

Related Posts