IMPIMP

Prakash Ambedkar | संजय राऊत यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हा सल्ला जर…’

by nagesh
Prakash Ambedkar | vanchit bahujan aaghadi leader prakash ambedkar comment on shivsena leader sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून महाविकास आघाडीतील (MVA) नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाराज झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकर यांना सल्ला दिला. पण त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा सल्ला दिला असता, तर मानला असता. असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावल्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीची युती शिवसेनेशी झाली आहे.
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणतेही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रू नाहीत. पण वंचित बहुजन आघाडी एआयएमआयएमशी (AIMIM) युती करणार नाही. असा पुनरूच्चार यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच यापुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर (BJP) भाष्य केले. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, जर भाजपाने मनुस्मृती सोडली तर त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते. हुकुमशाही थांबविणे आणि लोकशाही वाचविणे ही सध्याची गरज आहे. त्यामुळे जे जे लोकशाहीवादी आहेत, अशा सर्व पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. हीच आमची देखील भूमिका आहे. असे देखील यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

दरम्यान, शरद पवार यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही.
काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आहेत.
त्यामुळे त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी अशी वक्तव्ये करणे आम्हाला मान्य नाही.
तसेच प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेताना शब्द जपून वापरायला हवेत.
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्र काम करायचे आहे.
त्यामुळं भूतकाळातील मतभेद आपल्याला दूर ठेवायला हवेत आणि भक्कम आघाडी उभी राहायला हवी.’
असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Prakash Ambedkar | vanchit bahujan aaghadi leader prakash ambedkar comment on shivsena leader sanjay raut

 

हे देखील वाचा :

Nanded Crime | सैराटची पुनरावृत्ती! नांदेडमध्ये प्रेमसंबंधामुळे कुटुंबीयांनीच केली पोटच्या लेकीची हत्या

Pune Crime News | स्वत:च्या घराला, गाडीला आग लावली अन् तमाशात जाऊन बसला, तरुणाचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले; पुणे जिल्ह्यातील घटना

Pathaan Housefull | पठाण चित्रपटामुळे काश्मिरमधील थिएटरबाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड

 

Related Posts