IMPIMP

Preity Zinta | प्रीती झिंटाने दिला जुळ्या बाळांना जन्म !

by nagesh
Preity Zinta | preity zinta welcomes twins jai and gia with husband gene goodenough through surrogacy

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) आणि तिचा नवरा जीन गुडइनफ (Jene Goodenough) यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक गोड बातमी शेअर केली. या जोडप्याने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी स्वतः प्रितीने (Preity Zinta) इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. या घोषणेसोबत त्याने आपल्या दोन मुलांची नावेही सर्वांना सांगितली आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

या पोस्टमध्ये प्रितीने तिच्या पतीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यासह त्याने लिहिले आहे. “सर्वांना नमस्कार, मला आज एक मोठी बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत आणि यावेळी आमचं मन कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेलं आहे.आम्ही आमच्या जुळ्या मुलांचे, जय झिंटा गुडनफ आणि जिया झिंटा गुडनफ या आमच्या चिमुकल्यांना आमच्या परिवारात स्वागत करतो.

 

 

प्रीतीने लिहिलेल्या पोस्टच्या शब्दांतून तिच्या मनातील आनंद स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी आपल्या मुलांची नावे जय आणि जिया ठेवली आहेत. जय हा मुलगा आणि जिया ही मुलगी आहे.

 

प्रीतीच्या (Preity Zinta) या पोस्टवर तिला चाहत्यांनी त्याच प्रमाणे तिच्या मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या आहे.

 

Web Title :- Preity Zinta | preity zinta welcomes twins jai and gia with husband gene goodenough through surrogacy

 

हे देखील वाचा :

PM Kisan | कोट्यावधी शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! आता ‘या’ कागदपत्राशिवाय मिळणार नाही ‘पीएम किसान’चे पैसे, मोदी सरकारने बदलले नियम

Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ चांगल्या योजनांमध्ये गुंतवा पैसा, जाणून घ्या किती वेळात होतील दुप्पट

Ananya Pandey | मनीष मल्होत्राने डिजाईन केलेल्या लेहेंग्यांमध्ये अनन्या पांडेचं स्टनिंग फोटोशूट

 

Related Posts