IMPIMP

Priyanka Chopra | लखनऊमध्ये पोस्टर लावून अभिनेत्री प्रियांका चोप्राचा केला निषेध, काय आहे नेमके प्रकरण?

by nagesh
Priyanka Chopra | protest against priyanka chopra in lucknow

सरकारसत्ता ऑनलाईन  – तब्बल तीन वर्षांनी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) भारतात परतल्यावर तिने भारतात येताच तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले होते. प्रियंका (Priyanka Chopra) तिच्या हेअर प्रॉडक्ट अनोमलीच्या प्रमोशनसाठी मुंबईत आली होती. याच कार्यक्मासाठी प्रियंका लखनऊमध्ये देखील दाखल झाली होती. मात्र लखनऊमध्ये (Lucknow) तिच्या विरोधात काही पोस्टर्स आढळून आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रियंका चोप्रा उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) मुलींवर हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लखनऊच्या दौऱ्यावर आहे. प्रियांका लखनऊला पोहोचायच्या आधीच गोमतीनगर येथील संतमूलक चौकाजवळ तिच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले. पोस्टरवर असे लिहिण्यात आले की ‘यु आर नॉट वेलकम सिटी ऑफ नवाब’. गोमती नगर पोलीस सध्या हे पोस्टर कोणी लावले याचा शोध घेत आहेत. अद्यापही पोलिसांच्या हाती काही लागले नाही.

 

प्रियंका (Priyanka Chopra) युनिसेफच्या वतीने अनेक कार्यक्रमात लखनऊमध्ये उपस्थित राहणार
असल्याने दोन दिवस ती लखनऊ मध्येच आहे.
सोमवारी तिने प्राथमिक शाळेतील उपक्रमात सहभाग नोंदवला त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रात होणाऱ्या उपक्रमाचे देखील तिने निरीक्षण केले.
तर मंगळवारी अभिनेत्री प्रियंका लोकबंधू हॉस्पिटलमध्ये जाणार असून वन स्टॉप सेंटर 181 महिला हेल्पलाइनवर जाणार आहे.
त्याचबरोबर ती गोमती नगर येथील युनिसेफ कार्यालयासह न्यू बोर्न केअर युनिट आणि महिला रुग्णालयाला देखील भेट देणार आहे.

 

 

प्रियंकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रियंका लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये
(Bollywood) पदार्पण करणार आहे.’जी ले जरा’ (Jee Le Jara) या चित्रपटातून ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये
येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा सोबत कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि
आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2011 मध्ये आलेला
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

Web Title :-  Priyanka Chopra | protest against priyanka chopra in lucknow

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | 50 खोके घेतल्याचा आरोप करणं अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना महागात पडणार?, शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय

Pune Crime | येरवडा कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी; हवालदारास मारहाण

Adarsh Shinde | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या उत्कर्षसाठी आदर्श शिंदेनी लिहिली पोस्ट, म्हणाला….

 

Related Posts