IMPIMP

PSI | शेतकऱ्याची लेक झाली PSI, आई-बाबांचे स्वप्न केले पूर्ण

by nagesh
PSI | Daughter of Farmer Becomes Police Sub Inspector Solapur District Karmala Taluka Kugaon News

करमाळा : सरकारसत्ता ऑनलाइनसोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) करमाळा तालुक्यातील (Karmala Taluka) कुगावच्या (Kugaon)
शेतकऱ्याची मुलगी पोलीस उपनिरीक्षक (PSI) झाली आहे. कठोर परिश्रम घेत तिने आई-बाबांचे स्वप्न पुर्ण केले आहे. सारिका नारायण मारकड
(Sarika Narayan Markad) या शेतकऱ्याच्या मुलीची लोकसेवा आयोगाच्या (MPSC) घेण्यात आलेल्या परिक्षेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर
निवड झाली आहे. तिच्या या यशाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव या लहान गावातील सारिका (संध्या) मारकड या शेतकऱ्याच्या मुलीने आपल्या कष्टाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. सारिका कुगावच्या बाहेर शेत वस्तीमध्ये कुटुंबासमवेत राहते. जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळेत तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण चिखलठाणा विद्यालय (Chikalthana Vidyalaya), तर 12 वी पर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून (Yashwantrao Chavan College) वाणिज्य (Commerce) शाखेतून पूर्ण केले. यानंतर पुण्यातील (Pune) मुक्ताई सुतार अध्यापक विद्यालय कोथरुड (Muktai Sutar Adhyapak Vidyalaya Kothrud) येथून तिने डी.एड (D.Ed.) पूर्ण केले.

 

 

सुरुवातीला शिक्षण होण्याची इच्छा होती. मात्र डी.एड करत असताना तिला मावशीकडून प्रशासकीय क्षेत्रात (Administrative Field) येण्याची प्रेरणा मिळाली. नोव्हेंबर 2014 ला तिने स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाठी कोल्हापूर गाठले अन् तिचा नवा प्रवास सुरु झाला. त्याचवेळी तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (Yashwantrao Chavan Open University Nashik) येथून बीए (BA) करण्यास सुरुवात केली आणि स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत राज्यशास्त्राची (Political Science) पदवी घेतली. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती मात्र, थोड्या मार्काने तिला अपयश येत होते. मात्र, ती खचली नाही. 2018 च्या परीक्षेत आपण नक्की पास होऊ असा आत्मविश्वास तिला होता. पण यावेळीही यशाने तिला हुलकावणी दिली. यामुळे काही दिवस डिप्रेशनमध्ये गेले. मात्र सहा महिन्यानंतर नव्या उमेदीने तिने अभ्यासाला सुरुवात केली. ती पुण्यात आली. वडिलांचा विरोध होता. मात्र जसजशी पुर्व, मुख्य परिक्षा पास होत गेली तसे तिला वडिलांची साथ मिळाली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सारीकाच्या घरात दहावी शिकलेली ती पहिली मुलगी आहे. तिचे आई-वडील शेती करतात. ज्या ज्या वेळी ती गावी जाते त्यावेळी ती आपल्या आई -वडिलांना शेतात काम करण्यास मदत करायची. याचा फायदा तिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या शारीरिक चाचणीवेळी (Physical Test) झाला. तिला 100 पैकी 100 गुण मिळाले. दरम्यान कोरोनाची लाट (Corona Wave) आली आणि तणावाचे वातावरण बनलं. वय वाढत होतं. बऱ्याच मुलींची लग्न होत होती. पण तिच्या आई-वडिलांनी तसे न करता तिला धीर दिला. अभ्यासात प्रोत्साहन दिले. 2019 ला परीक्षा दिलेली पण कोरोनामुळे सर्व लांबणीवर पडलं. 2019 चा निकाल 2022 मध्ये लागला. सारिकाने कष्टाच्या जोरावर यश मिळवलं. तिच्या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यात तिचे कौतुक होत आहे. आज सारिका तिच्या गावात आदर्श ठरली आहे.

 

 

web title : PSI | Daughter of Farmer Becomes Police Sub Inspector Solapur District Karmala Taluka Kugaon News

 

हे देखील वाचा :

Herschelle Gibbs | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी ! सौरव गांगुली आणि जय शहांवर ‘या’ माजी क्रिकेटपटूने केला खळबळजनक आरोप

Gold Silver Price Today | 20 दिवसांतच सोन्याच्या किंमतीत 4,087 रुपयांची घसरण, चांदीही…; जाणून घ्या नवीन दर

Keshav Upadhye | ‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंनाही तोच सल्ला दिला असता’ – केशव उपाध्ये

 

Related Posts