IMPIMP

Pune ACB Trap News | लाच घेताना पुणे महापालिकेतील कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
Pune ACB Trap News | Employees of Pune Municipal Corporation (PMC) caught in anti-corruption net while taking bribes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) गाडीवर काम देण्यासाठी चार हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पुणे मनपा, व्हेईकल डेपो, गुलटेकडी (Vehicle Depot, Gultekdi) येथील स्टार्टर (वाहन वाटप) विभागातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap News ) सापळा रचून रंगेहाथ पकडले. पांडुरंग साधू लोणकर Pandurang Sadhu Lonkar (वय-57) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीच्या (Pune ACB Trap News ) पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि.22) स्वारगेट येथील शंकर शेठ रोडवरील (Shankar Sheth Road) क्वालिटी स्पेशल चहाच्या (Quality Special Tea) टपरी समोर केली. (Pune Bribe Case)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत 32 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीच्या (Pune ACB Trap News) कार्यालयात तक्रार दिली आहे. पथकाने 16 आणि 20 ऑगस्ट रोजी पडताळणी करुन मंगळवारी (दि.22) सापळा कारवाई केली. तक्रारदार हे खाजगी कंत्राटी वाहन चालक (Vehicle Driver) असून पांडुरंग लोणकर यांनी तक्रारदार यांना मनपाच्या गाडीवर दररोज काम नेमूण देण्याकरिता चार हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीच्या (Pune ACB Trap News) कार्यालयात तक्रार दिली.
त्यानुसार पथकाने पडताळणी केली असता पांडुरंग लोणकर यांनी मनपाच्या गाडीवर दररोज काम देण्यासाठी चार
हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी स्वारगेट (Swargate) येथील शंकर शेठ रोडवरील चहाच्या टपरीसमोर सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पांडुरंग लोणकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लोणकर यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB) पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक विरनाथ माने (PI Virnath Mane) पोलीस अंमलदार रियाज शेख, माने,
पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.

Related Posts