IMPIMP

Pune Accident News | सिंहगड घाटात प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटली, 10 ते 12 पर्यटक जखमी

by sachinsitapure
Pune Accident News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात अपघात होत आहेत. यातच सिंहगड घाट रस्त्यावर (Sinhagad Ghat Road) प्रवासी वाहतूक करणारी जीप पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात (Major Jeep Accident) 10 ते 12 पर्यटक जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.17) सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (Pune Accident News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सिंहगड घाट रस्ता अतिशय धोकादायक ठरत आहे. पर्यटकांना (Tourists) पायथ्यावरुन गडापर्डंत (Sinhagad Fort) आणि पुन्हा खाली आणण्यासाठी जीप वाहतूक सेवा सुरु करण्यात आली आहे. परंतु हीच वाहतूक सेवा पर्यटकांसाठी जीव घेणी ठरत आहे. रविवारी संध्याकाळी काही पर्यटकांना घेऊन एक जीप पायथ्याला येत होती. मात्र, घाट रस्त्यावरील अकरा हजार वळणाजवळ जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप पलटी (Pune Accident News) झाली. अपघात झाला त्यावेळी जीपमध्ये 10 ते 15 पर्यटक प्रवास करत होते.

जीप पलटी झाल्याने पर्यटक जीपमध्ये अडकले होते. दरम्यान,
तेथून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी वाहने थांबवून अपघातग्रस्त जीपमधून पर्यटकांना बाहेर काढले.
या अपघाताची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी (Forest Department Officer)
व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पर्यटकांना तात्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
जीपचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Related Posts