IMPIMP

Pune Accident News | लोणावळ्यात जुन्या महामार्गावर भीषण अपघात, उतारावरील वळणावर कंटेनर उलटला, तिघांचा मृत्यू

by sachinsitapure
Pune Accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Accident News | एक भरधाव कंटेनर उतारावरील वळणावर उलटला आणि घसरत जाऊन दोन दुचाकींना त्याने जोरदार धडक दिली. आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास लोणावळ्यात झालेल्या या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे. जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय मार्गावर (Old Mumbai Pune Highway) लोणावळा आणि खंडाळादरम्यान हॉटेल मयूर समोरील वळणावर हा अपघात घडला. अपघातात (Pune Accident News) ३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सुद्धा एका लहान मुलाचा समावेश आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती. विशेष म्हणजे लोणावळा शहरातून जाणाऱ्या
राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना दिवसभर बंदी असताना सुद्धा हा कंटेनर पुण्याच्या बाजूकडून मुंबईच्या दिशेने जात होता.

कंटेनर लोणावळा शहरातून थोडा पुढे गेल्यानंतर उतारावरील वळणावर तो पलटी झाला. कंटेनर घसरत पुढे जाऊन लोणावळ्याच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना धडकला. या अपघातात (Pune Accident News) दुचाकीवरील एक लहान मुलगी आणि दोन जणांचा मृत्यू झाला तर एक लहान मुल आणि दोघेजण जखमी झाले.

लोणावळा शहरातून अवजड वाहनांना बंदी असतानाही हा कंटेनर चालक जुन्या मार्गावर आल्याने नागरिक संतप्त
झाले आहेत. कंटेनर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली जात आहे.

Related Posts