IMPIMP

Pune Accident | शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात हॉटेल मॅनेजरसह तीन तरुण ठार

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात (Pune Accident) तीन तरुणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये एका हॉटेल मॅनेजरचा (Hotel Manager) समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. डेक्कन (Deccan) परिसरातील कर्वेनगर रस्त्यावरील रस शाळेसमोर (Rasashala) झालेल्या अपघातात (Pune Accident) दोन तरुण ठार झाले. शनिवारवाड्याजवळ विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार टेम्पोला धडवूâन ठार झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सिमेंट मिक्सर आणि दुचाकीस्वाराच्या झालेल्या भीषण अपघातात (Pune Accident) मनोज रमेश पाटील Manoj Ramesh Patil (वय 23 रा. बाणेर) आणि नितीन बालाजी मगर Nitin Balaji Magar (वय 19, रा. बिबवेवाडी) यांचा मृत्यू झाला. याप्रकरण सिमेंट मिक्सर वाहनचालक अनिलकुमार कमलेश भारद्वाज Anil Kumar Kamlesh Bhardwaj (वय 29) याला डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) अटक (Arrest) केली आहे. पोलीस अंमलदार निखील शेडगे Nikhil Shedge (वय 26) यांनी तक्रार दिली आहे.

 

मनोज पाटील बाणेर मधील एका हॉटेलात मॅनेजर होता. त्याचा मित्र नितीन खासगी कंपनीत नोकरीला होता. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून ते नळ स्टॉपकडे जात होते. त्यावेळी वैद्यराज मामा गोखले चौकात (रसशाळा) सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि दुचाकीस्वारामध्ये अपघात झाला. अपघातात मनोज जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या नितीनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे (PSI Ganesh More) तपास करत आहेत.

 

शनिवारवाड्याजवळ (Shaniwar Wada) झालेल्या अपघातात संदीप शिककाप्रसाद वरूण
Sandeep Shikkaprasad Varun (वय २२, रा. चिंचवड) हा तरुण ठार झाला.
त्याचा मित्र विशाल कनिकराम वरूण Vishal Kanikaram Varun (वय ३०) गंभीररित्या जखमी झाला आहे.
याप्रकरणी बाळासाहेब सावंत Balasaheb Sawant (वय ३६) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात
(Faraskhana Police Station) तक्रार दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शनिवारवाडा परिसरातून दगडूशेठकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक आहे.
मात्र, संदीप विरूद्ध दिशेने दुचाकी चालवित चालला होता. त्यावेळी समोरून आलेल्या टेम्पो चालकाने त्याला धडक
दिली. गंभीर जखमी झाल्याने संदीपचा मृत्यू झाला.
विशाल जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक सुशील बोबडे (API Sushil Bobde) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Accident | Three youths including a hotel manager were killed in two separate accidents in the city

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वीजेचा धक्क्याने मजूर ठार, ठेकेदार व जागा मालकाविरूद्ध FIR; जांभुळवाडीतील घटना

T20 World Cup | भारतासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ गोलंदाज ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

Sanjay Raut | प्रिय आई, जय महाराष्ट्र; संजय राऊतांचे आर्थर रोड तुरुंगातून आईला पत्र, म्हणाले-‘…म्हणून मला तुझ्यापासून दूर जावे लागत आहे’

 

Related Posts