IMPIMP

Pune Corona Update | दिलासादायक! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 132 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहरातील रुग्णांची संख्या कमी होत असताना मृतांची संख्या देखील कमी झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 132 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 226 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे शहरात आज दिवसभरात विविध तपासणी केंद्रावर 2593 लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 132 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुणे शहरात आजपर्यंत 44 लाख 65 हजार 956 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 59 हजार 266 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 47 हजार 847 इतके रुग्ण बरे झाले आहेत.

 

पुण्यात गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 337 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2 हजार 082 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये 119 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 18 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 12 रुग्ण आहेत.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 19.35 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | Comfortable! Diagnosis of 132 new patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक, मोक्का गुन्ह्यात 4 वर्षापासून होता फरार

Punyabhushan Award | पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी ‘सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कारा’चे वितरण

Pune Crime | इंदापूरमधील शासकीय गोडाऊनजवळ राहणार्‍या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांची ‘ती’ पत्रं ठेवली समोर

 

Related Posts