IMPIMP

Pune Crime News | एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, कोथरुड मधील प्रकार

by sachinsitapure
Cheating Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून (SBI Credit Card Department) बोलत असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 3 मे 2023 ते 15 मे 2023 या कालावधीत कोथरुड येथे घडला आहे. या प्रकरणी (Pune Crime News) अनोळखी मोबाईल धारकावर गुन्हा (Pune Police) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुरेश महादेव साळुंके Suresh Mahadev Salunke (वय-64) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 9718601364 या मोबाईल धारकावर तसेच बँक खाते धारकावर आयपीसी 419, 420, आयटी अॅक्ट (IT Act) प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी मोबाईल धारकाने फिर्यादी यांच्या मोबाईलवर संपर्क साधला.
आरोपीने एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
जुने क्रेडिट कार्ड बंद करुन नवीन क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर त्यावरील फिर्यादी यांचे नाव, मोबाईल क्रमांक,
क्रेडीट कार्ड वरील क्रमांक बरोबर आहे का, अशी विचारणा केली.
यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर (OTP) घेतला.
ओटीपी नंबर घेऊन आरोपीने फिर्यादी यांची 2 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior PI Hemant Patil) करीत आहेत.

Related Posts